Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या चाहत्यांची आता प्रतीक्षा संपली आहे. टेलिव्हिजनवरील वादग्रस्त लोकप्रिय रिअॅलिटी शो ६ ऑक्टोबरपासून सुरू होतं आहे. यंदा ‘बिग बॉस’चं १८वं पर्व असणार आहे. नेहमीप्रमाणे थोडं खास आणि थोडं हटके हे पर्व पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’चं १८वं पर्व भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळावर आधारित असणार आहे. त्यामुळे सध्या नेमकं या पर्वात काय होणार आहे? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात ( Bigg Boss 18 ) सहभागी होणाऱ्या काही स्पर्धकांचे दमदार प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. शिल्पा शिरोडकर, शेहजादा धामी, चाहत पांडे, अॅड. गुणरत्न सदावर्ते, विवियन डीसेना, नायरा बनर्जी, एलिस कौशक हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. याआधी कुठल्याही रिअॅलिटी शोमध्ये असं घडलं नव्हतं. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ स्पर्धक निवडले गेले आहेत. याचा प्रोमो सध्या खूप व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – “हे खूप प्रेम, हसणं आणि…”, प्रिया बापटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली…
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ( Bigg Boss 18 ) ग्रँड प्रिमियरला टॉप-२ फायनलिस्ट निवडले गेले आहेत. ‘कलर्स टीव्ही’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान स्वतः दोन फायनलिस्टचा खुलासा करताना दिसत आहे. हे ऐकून टॉप-२ फायनलिस्टला देखील धक्का बसला आहे. ते स्वतः हे खरं आहे का? असं सलमान खानला विचारताना दिसत आहेत. सलमान खानदेखील हे खरं असल्याचं सांगत, ‘बिग बॉस’ टॉप-२ फायनलिस्टची घोषणा करत आहेत.
हेही वाचा – Raat Jawaan Hai Promotion: भिन्न प्रकृतीची चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण; अभिनेत्री प्रिया बापटचे मत
प्रोमोध्ये टॉप-२ फायनलिस्टचे चेहर दाखवण्यात आलेले नाहीत. पण नेटकऱ्यांनी याचा अंदाज लावला आहे. एक अभिनेता विवियन डीसेना असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरी फायनलिस्ट एलिस कौशिक असल्याची चर्चा सुरू आहे. पण हेच दोघं टॉप-२ फायनलिस्ट आहेत का? हे ६ ऑक्टोबरच्या ग्रँड प्रिमियरला समोर येईल.