Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा जसजसा जवळ येत आहे. तसा शो आणखी रंगदार होतं चालला आहे. मिड एविक्शन, डबल एविक्शन पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला फक्त दोन आठवडे बाकी आहेत. १९ जानेवारीला महाअंतिम सोहळा असल्याचं म्हटलं जात आहे. पण, त्यापूर्वी सलमान खान सदस्यांची चांगलीच शाळा घेताना पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १३वा आठवडा सुरू आहे. या आठवड्याच्या वीकेंड वारला काही खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. सध्या वीकेंडच्या वारचा एक प्रोमो खूप चर्चेत आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री काम्या पंजाबी आणि सलमान खान विवियन डिसेनाची कानउघडणी करताना दिसत आहेत.
‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्रामवर वीकेंडच्या वारचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री काम्या पंजाबी विवियन डिसेनाला म्हणते, “तू काय केलंस? इतके वर्ष तुला ‘बिग बॉस’मध्ये बोलावलंत होते. आला नाहीस. मग यावर्षी का आलास? विवियन फुस्स..थंडा…मी तुझा खेळ पाहून खूप निराश आहे.” त्यानंतर सलमान खान म्हणतो, “घरच्या मैदानावर खेळतोय आणि तिथेच तू हरतोय. तर काय फायदा?” पुढे काम्या म्हणाली की, यांच्या मालिकेत तू लीड केलं आहेस. पण या शोमध्ये तू लीडर बनू शकला नाहीस.
मग सलमान म्हणाला, “विवियनचं लक्ष फक्त त्याच्या आवाजावर आणि लूकवर आहे. हा एक तिथे भूमिका निभावत आहे. हा विवियन नाहीच आहे.” नंतर काम्या म्हणाली, “आता असं वाटलं, नूरन आली आणि डॅमेज कंट्रोल केलं. जर विवियन अविनाशचं ऐकलं नसतं तर क्रॉन्ट्रोब्युशन चांगलं असतं. हे तुला चांगलंच वाटलं का?” पुढे सलमान म्हणाला की, जर ते झालं, तर हे झालं असतं, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे …तर भावा आता खेळत संपला आहे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विवियन डिसेनाची पत्नी नूरन अली ‘बिग बॉस’च्या घरात आली होती. यावेळी तिने अविनाश मिश्राला सुनावलं. अविनाशने विवियनला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं होतं, तसंच विजेता होण्यास अपात्र असल्याचं सांगितलं होतं, त्यावर नूरन आपलं स्पष्ट मत मांडताना दिसली होती.