Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सध्या फॅमिली वीक सुरू आहे. त्यामुळे सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी चाहत पांडेची आई आली होती. यावेळी चाहतची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच अविनाश मिश्रावर गंभीर आरोप करू लागली. याच प्रकरणावरून आता सलमान खान भडकला असून त्याने वीकेंडच्या वारला चाहतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

चाहत पांडेची आई अविनाश मिश्राला म्हणाली होती की, तू ज्या प्रकारे चाहतबद्दल बोलला आहेस, तशी ती मुलगी नाहीये. आमचं कुटुंब तुला कधीच माफ करणार नाही. त्यानंतर चाहतशी बोलताना तिची आई म्हणाली होती, “जेव्हा आम्ही तुला विचारलं होतं, तुझं आणि अविनाशचं पटतं का नाही? तेव्हा तू आम्हाला सांगितलं होतंस की, मला अविनाश आवडत नाही. कारण तो स्त्रीलंपट माणूस आहे.” एवढं सगळं होऊनही अविनाशने चाहत पांडेच्या आईची माफी मागितली. पण, हा वाद इथेच संपला आहे. याचे पडसाद वीकेंडच्या वारला उमटले आहेत.

Bigg Boss Marathi fame Ankita prabhu Walawalkar share special post after visit akkalkot
“आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?” ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
Farah Khan
“शाहरुख कुठे उभा राहील?” शिल्पा शिरोडकरच्या वजनावर फराह खानने केलेली कमेंट; अभिनेत्री म्हणाली…
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…

हेही वाचा – Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया

‘कलर्स टीव्ही’ने नुकताच वीकेंडच्या वारचा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान चाहतला म्हणाला की, तुझ्या आईने म्हटलं होतं, चाहतला अशी मुलं आवडत नाहीत, जे मुलींच्या पुढे-मागे करत असतात. तुझ्या आईने तुला तू खूप चांगली असल्याचं प्रमाणपत्र देऊ टाकलं. पण, त्यानंतर काही लोकांनी आमच्या टीमला फोन केला. तुला एक गोष्ट दाखवू इच्छितो.”

त्यानंतर चाहतचा एक फोटो दाखवला. ज्यामध्ये तिच्याबरोबर एक केक होता. ज्यावर लिहिलं होतं, ‘नात्याला ५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शुभेच्छा…माझं प्रेम.’ हे पाहून चाहत हैराण झाली. यावेळी अविनाश म्हणाला, “हे स्वीकार.” तर चाहत म्हणाली, “अविनाश असं करू नकोस.” मग अविनाश म्हणाला की, चाहत सेटवर सगळ्यांना माहीत आहे. तरीही चाहतने नकार दिला. शेवटी सलमान म्हणाला, “असेल तर हो म्हण, नसेल तर नाही म्हण.” वीकेंडच्या वारचा हा प्रोमो सध्या खूप व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: “माझं नाव घेऊन एका मुलीच्या चारित्र्यावर…”, अखेर शालीन भनोटने ईशा सिंहबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला…

दरम्यान, सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १३वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, चाहत पांडे, कशिश कपूर, रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुन घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही आठवडे बाकी आहेत. त्याआधी या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader