Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठा धमाका झाला आहे. एक नाही तर दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. ‘स्प्लिट्सविला १५’मध्ये झळकलेले दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी झाले आहेत. नुकताच दोघांच्या एन्ट्रीचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये वाइल्ड कार्ड सदस्यांच्या एका कृतीमुळे सलमान खान डोक्याला हात लावताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस १८’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाइल्ड कार्ड दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर यांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सलमान खान म्हणतोय की, माझ्याकडे या पर्वातील वाइल्ड कार्ड धमाके आहेत. त्यानंतर दिग्विजय आणि कशिशची एन्ट्री होते. मग सलमान दोघांना विचारतो की, तुम्ही एकमेकांना ओळखता? तेव्हा कशिश कपूर म्हणते, “मी मेन कॅरेक्टर आहे.”

हेही वाचा – Video: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांचा दिवाळी स्पेशल Reel व्हिडीओ पाहिलात का? नेटकरी करतायत कौतुक

पुढे दिग्विजय म्हणतो की, मी १० पॉडकास्टवर जाऊन तुझं नावदेखील घेतलं नाही. त्यावर कशिश म्हणते, “तू पूर्ण कर. मग मी बोलते. सांभाळून. शेवटी तुझ्या नशीबाची दोरं माझ्याचं हातात होती आणि आज जे तू इथे आहेस. ते माझ्यामुळेच आहेस. विसरू नकोस.” त्यानंतर दिग्विजय तिच्याबद्दल काय म्हणाला होता, हे सांगताना कशिश दिसत आहे. “या मुलीच्या लोभापायी माझ्या लहानपणीचं स्वप्न भंग झालं. माझी आई रडते”, असं कशिश म्हणते. यावर दिग्विजय म्हणाला की, खरं आहे. ते बोललो आहे.

एकाबाजूला दिग्विजय आणि कशिशचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. हेच पाहून दुसऱ्याबाजूला सलमान खान वैतागतो आणि तो डोक्यालाच हात लावतो. त्यानंतर दिग्विजय सलमानला म्हणतो, “भाई, मला आयुष्यात ही नकारात्मकता अजिबात नकोय.” तेव्हा सलमान खान विचारतो, “तुमचं झालं?” त्यावर कशिश म्हणते, “याचं बोलून झालं असेल तर माझं पण झालं आहे.”

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलने दिवाळीनिमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, राखी सावंतच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूरमध्ये नेमकं काय झालं होतं?

‘स्प्लिट्सविला १५’मध्ये शेवटच्या काही भागांमध्ये दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूरची जोडी बनली होती. पॉवर कपल म्हणून दोघांना ओळखलं जातं होतं. दोघं ‘स्प्लिट्सविला १५’च्या फिनालेपर्यंत पोहोचले होते. पण जिंकण्याची संधी कशिशमुळे हुकली. ‘स्प्लिट्सविला १५’च्या फिनालेपर्यंत गेलेल्या तीन कपलला फिनाले आणि पैसे या दोनमधील एक पर्याय निवडायचा होता. दिग्विजय आणि कशिशला व्यक्तिरिक्त असलेल्या दोन्ही कपलने फिनाले पर्याय निवडला होता. पण कशिशने एकटीनेच पैसे हा पर्याय निवडला. त्यामुळे दिग्विजयचं ‘स्प्लिट्सविला १५’ जिंकण्याचं स्वप्न भंग झालं. तेव्हापासून दोघांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 salman khan was upset after hearing the accusations and counter accusations of the wild card digvijay singh rathee kashish kapoor pps