‘बिग बॉस १८’ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांची सतत चर्चा होताना दिसते. सलमान खान होस्ट करीत असलेल्या या शोमध्ये वाद-विवाद, भांडणे याबरोबरच मजा-मस्तीदेखील होताना दिसते. या बिग बॉस १८ चा एक प्रोमो समोर आला आहे.
बिग बॉस १८’मध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगणची एन्ट्री
एंडेमोल शाइन इंडियाने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये पाहायला मिळते की, ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानबरोबर रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी हजेरी लावली आहे. यावेळी रोहित शेट्टीने घरातील सदस्यांना एक टास्क दिल्याचे पाहायला मिळत आहे. करणवीर मेहराच्या हातात करंट बेल्ट्स आहेत. तो घरातील सर्व सदस्यांना याबद्दल माहिती देत आहे. तो म्हणतो, “हे करंट बेल्ट्स आहेत; ज्यामध्ये स्पर्धकांची सहनशक्ती बघितली जाते.” तितक्यात रोहित शेट्टी म्हणतो, “ठीक आहे. मात्र, मी काहीतरी वेगळे करू इच्छितो. करण याची सुरुवात तुझ्यापासून करणार आहे.”
त्यानंतर करणने करंट बेल्ट्स हातात घातले आहेत. रोहित शेट्टी म्हणतो, तुझ्याविषयी मी घरातील इतर सदस्यांना प्रश्न विचारेन. जर त्याचे उत्तर त्यांनी नाही, असे दिले, तर तुला करंट बसेल. पहिला प्रश्न मी सलमानसरांना विचारतो. “करण ‘खतरों के खिलाडी’चे हे पर्व हरून आला आहे का? करण म्हणतो की, होय मी ‘खतरों के खिलाडी’ हरून आलो आहे. सलमान होय म्हणताना दिसतो. सलमान घरातील इतर सदस्यांना विचारतो की, करण या घरातील सर्वांत चांगले वागणारा माणूस आहे. त्यावर ईशा हसत हसत म्हणते की, नाही सर. त्यानंतर करणला जोरात शॉक बसतो आणि तो मोठ्याने ओरडत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सलमान एलिसला विचारतो, “एलिस, तुला करणबरोबर लग्न करायला आवडेल का?” त्यावर करण म्हणतो, “होय म्हणत आहे ती” एलिस नाही म्हणताना दिसते. त्यावर पुन्हा त्याला करंट बसतो.
सलमान पुढे म्हणतो की, आता श्रुतिकाची वेळ आहे. त्यावर ती म्हणते, “सर, मी खतरों के खिलाडीसाठी योग्य नाही.” त्यानंतर करंट लागण्याआधीच लागण्याआधीच तो ओरडताना दिसत आहे. रोहित म्हणतो, “आता आपण शॉक टेस्ट करूयात.” रोहित शेट्टी विचारतो, “अर्जुनला श्रुतिकाची आठवण येत असेल?” त्यावर सलमान मला तसे वाटत नाही म्हणतो आणि तिला करंट बसतो. सलमान पुढचा प्रश्न विचारतो, “अविनाश, तू सांग श्रुतिका सगळ्यांची लाडकी बनण्यासाठी योग्य होती का?” आता त्याचे उत्तर तो काय देणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम ३’ हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘सिंघम ३’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसली. आता चित्रपटालादेखील अशीच पसंती मिळणार का, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘सिंघम ३’मध्ये अजय देवगणबरोबरच, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अजय देवगण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.