Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा जसजसा महाअंतिम सोहळा जवळ येत आहे, तसा शो दिवसेंदिवस रंगदार होतं आहे. आता ‘बिग बॉस’च्या या पर्वाच्या १३व्या आठवड्याला सुरुवात झाली आहे आणि एकूण १० सदस्य बाकी राहिले आहेत. त्यामुळे सदस्यांमध्ये आणखी चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या आठवड्यात कोण घराबाहेर झालं? जाणून घ्या…

नुकताच वीकेंड वार पार पडला. हा वीकेंडचा वार खूप खास होता, कारण होस्ट सलमान खानचा वाढदिवस होता. यानिमित्ताने वीकेंड वारला घरात हटके खेळ पाहायला मिळाले. तसंच सदस्यांनी सलमानच्या वाढदिवसानिमित्ताने एक परफॉर्मन्स केला. सलमानाने वाढदिवस असला तरीही बऱ्याच सदस्यांना चांगलंच सुनावलं. गेल्या आठवड्यात झालेल्या अविनाश मिश्रा आणि कशिश कपूरच्या प्रकरणावरून सलमानाने ईशा सिंहची चांगलीच शाळा घेतली. शिवाय कशिश, रजतला सुनावलं. त्यानंतर घरातील एक सदस्य एविक्ट झाली. ती म्हणजे सारा अरफीन खान.

Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bigg Boss 18 Vivian dsena apologises to fans in first post after grand Finale
Bigg Boss 18: “मला माफ करा…”, विवियन डिसेनाची ‘ती’ पोस्ट व्हायरल; म्हणाला, “मी खूप भावुक झालोय…”
chum darang welcome home video
Bigg Boss 18: १०५ दिवसांनी घरी गेल्यावर ‘असं’ झालं चुम दरांगचं स्वागत, पाहा व्हिडीओ
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Bigg Boss 18 Salman Khan announced Karan Veer Mehra as a winner Chum darang and Shilpa Shirodkar became happy
Bigg Boss 18: सलमान खानने करणवीर मेहराचं नाव घेताच चुम, शिल्पाला झाला आनंद; बाकी सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Grand Finale Winner Karanveer Mehra
Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला करणवीर मेहरा
Bigg Boss 18 Vivian Dsena angry on karan veer Mehra roasting
Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य

हेही वाचा – Video: “त्या रस्त्यावर बसलेल्या नाहीत…”, प्राजक्ता माळीबाबतच्या विधानावरून मेघा धाडे संतापली; म्हणाली, “तू घाबरून जाऊ नकोस”

या आठवड्यात ईशा सिंह, कशिश कपूर, सारा अरफीन खान, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, चाहत पांडे आणि रजत दलाल घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामधील चाहत पांडेला ‘टाइम गॉड’ चुम दरांगने विशेष अधिकाराचा वापर करून सुरक्षित केलं. त्यामुळे सहा सदस्यांवर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार होती. अखेर प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे सारा अरफीन खान घराबाहेर झाली. घराबाहेर येताच तिने कशिश कपूरमुळे एविक्ट झाल्याचा आरोप केला. तसंच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता रजत दलाल झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा – उर्मिला कोठारे कार अपघाताप्रकरणी चालकाला अटक, अभिनेत्रीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

हेही वाचा – प्राजक्ता माळीबाबतच्या विधानाचा निषेध करून किरण मानेंची खोचक पोस्ट; म्हणाले, “अचानक समस्त महिला वर्गाविषयी पुळका…”

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात अरफीन खान आणि सारा खान हे एक कपल होतं. हे दोघं अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळींचे लाइफ कोच आहेत. ‘बिग बॉस १८’मध्ये येण्याआधी बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने स्वतः अरफीन आणि साराची ओळख करून दिली होती. अरफीन आणि साराचे हृतिक रोशनशी खूप जवळचे संबंध आहेत.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील ११व्या आठवड्यात मिड वीक एविक्शन आणि डबल एविक्शन पाहायला मिळालं. मिड वीक एविक्शनमध्ये दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. त्यानंतर डबल एविक्शनमध्ये एडिन रोज, यामिनी मल्होत्रा बेघर झाल्या आणि आता सारा खान घराबाहेर झाली आहे.

Story img Loader