Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या नववा आठवडा सुरू आहे. नेहमीप्रमाणे सातत्याने भांडणं, शारिरीक हिंसा अशा अनेक गोष्टी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात पाहायला मिळत आहे. पण, पाहिजेत तसा टीआरपी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला मिळत नाहीये. त्यामुळे सातत्याने टीआरपीसाठी निर्मात्यांची धडपड पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यांपूर्वी तीन हॉट आणि बोल्ड वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली.

अदिती मिस्त्री, एडिन रोज आणि यामिनी मल्होत्रा हा तिघी वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाल्या. पण ‘बिग बॉस’मधील तिघींचा जबरदस्त खेळ दिसला नाही. त्यामुळे काही दिवसांनी तिघींना ‘बिग बॉस’ने घरातील इतर सदस्यांनी मनं जिंकण्यास सांगितलं. यामध्ये अदिती मिस्त्री कमी पडली, त्यामुळे ती बेघर झाली. आता ‘बिग बॉस’मध्ये आणखी एका सदस्याची भर पडली आहे. ‘फॅब्युलस लाइव्स वर्सेस बॉलीवूड वाइव्स’ या शोमधून प्रसिद्ध झोतात आलेली शालिनी पासीची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री झाली आहे. तिच्या एन्ट्रीचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. पण, ही शालिनी पासी नेमकी कोण आहे? जाणून घ्या…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक

हेही वाचा – Bigg Boss 18मधील ‘या’ सदस्याला दारू सोडण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने केली होती मदत, म्हणाला, “त्याने मला एक डायरी दाखवली…”

शालिनी पासी ही दिल्लीची लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. २०१०पासून ती गरजू मुलांना शिकवण्याचं काम करते. ती मुलांचं प्रशिक्षण घेते आणि त्यांना कला, हस्ताकला शिकवते. शालिनीचे पती संजय पासी पास्को ग्रुपचे चेअरमन आहे.

‘इकॉनोमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, पास्को ग्रुपचा महसूल २६९० कोटी रुपये आहे. २०१९मध्ये संजय यांनी तिरुपती मंदिरात १० कोटी रुपयांची देणगी दिली होती. १९९९मध्ये त्यांनी देशातील सर्वाधिक कर भरल्याबद्दल आयकर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. शालिनी आणि संजय यांचा १४ खोल्या आणि २० हजार स्क्वेअर फूट असलेला बंगला आहे.

हेही वाचा – Video: “आई ही माझी बेस्ट फ्रेंड…” स्वप्नील जोशीने आईच्या ७४व्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “माझं आयुष्य…”

दरम्यान, शालिनीची ‘बिग बॉस’ घरातील एन्ट्री पाहून इतर सदस्य हैराण झाले आहेत. घरात येताच तिने सगळ्यांना चांगलंच कामाला लावलं आहे. प्रोमोमध्ये सदस्य शालिनीच्या मागे-पुढे करताना दिसत आहेत. तसंच तिच्या मर्जीनुसार सर्व काही करताना सदस्य पाहायला मिळत आहेत.

Story img Loader