Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात आतापर्यंतचं सर्वात मोठं भांडण ६ डिसेंबरच्या भागात पाहायला मिळालं. अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि दिग्विजय राठी या तिघांमध्ये जोरदार भांडण झालं. एवढंच नव्हे तर यादरम्यान शारिरीक हिंसा देखील झाली. त्यामुळे सध्या या भांडणासंदर्भात सर्वत्र बोललं जात असून अविनाश, रजतला घराबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. यावरून फराह खाननेदेखील रजत दलालला शेवटची ताकीद दिली आहे.

वीकेंडच्या वारला सलमान खान ऐवजी फराह खान होस्ट करणार आहे. याच वेळी फराहने रजत दलालला चांगलंच सुनावलं आहे. “जर पुन्हा फिजिकल फाइट केली तर थेट शो बाहेर होशील”, असं फराह खानने रजतला इशारा दिला आहे. सोशल मीडियावर दिग्विजयच्या समर्थनार्थ अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहेत. यामध्ये आता ‘बिग बॉस ११’ची विजेतीदेखील सहभागी झाली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – १० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

‘बिग बॉस’चं ११ पर्व जिंकणारी शिल्पा शिंदेने दिग्विजयला समर्थन केलं आहे. ‘ई-टाइम्स’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शिल्पा शिंदेने दिग्विजय सिंह राठीबाबत म्हणाली की, “मला तो आवडतो. त्याला जे काही करायचं आहे, त्याबाबत तो क्लिअर आहे. तो खूप कमी वयात समजूतदार दिसतो आहे.”

त्यानंतर शिल्पा करणवीर मेहरा आणि दिग्विजयच्या मैत्रीबद्दल बोलली. म्हणाली की, “दिग्विजय वाइल्ड कार्ड म्हणून घरात आला तर तो कोणत्याही ग्रुपमध्ये जाऊन खेळू शकला असता. पण त्याने करणवीरशी मैत्री केली. मला खरंच असं वाटतं, त्या दोघांची मैत्री खूप चांगली आहे. चुम आणि दिग्विजय करणचे चांगले मित्र आहेत. पण, शिल्पा शिरोडकरशी त्याची मैत्री नाहीये.”

हेही वाचा – Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”

हेही वाचा – Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर

दरम्यान, या नवव्या आठवड्यात घरातील सदस्यांनी सहा जणांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. यामध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दिग्विजय राठी, कशिश कपूर आणि सारा अरफीन खान यांचा समावेश आहे. या सहा जणांमधून कोण घराबाहेर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader