Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात २०२५ या नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नवीन वर्षानिमित्ताने ‘बिग बॉस’मध्ये काही खास कार्यक्रमाचं आयोजित केले होते. तसंच अभिनेत्री कंगना रनौतपासून करण कुंद्रा, भारती सिंह असे काही कलाकार उपस्थित राहिले होते. तसंच या भागात ज्योतिषी प्रदीप किराडू आले होते. त्यांनी सर्व सदस्यांना हटके नावं देऊन भविष्य सांगितलं. आता ‘बिग बॉस’चे प्रेक्षक ज्याची वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. ते म्हणजे फॅमिली वीक.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील फॅमिली वीकला आता सुरुवात झाली आहे. याचे प्रोमोदेखील समोर आले आहेत. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला भेटण्यासाठी तिची लेक अनुष्का ‘बिग बॉस’च्या घरात आली आहे. नुकताच तिचा प्रोमो ‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ८६ दिवसांनंतर लेकीला पाहून शिल्पा भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या मुलीच्या मराठी संवादाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: पत्नीला पाहताच विवियन डिसेनाचे अश्रू अनावर; दोघांचा रोमँटिक प्रोमो पाहून निक्की तांबोळी म्हणाली…

‘कलर्स टीव्ही’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, सुरुवातीला काळ्या रंगाचा आउटफिट घालून अनुष्काची ‘बिग बॉस’च्या घरातील एन्ट्री पाहायला मिळत आहे. त्यानंतर अनुष्का आई शिल्पाला भेटण्यासाठी जाते. तेव्हा लेकीपाहून शिल्पा भावुक होते आणि म्हणते, “ओ अनुष्की…आय लव्ह यू सो मच…मला तुझी खूप आठवण येते. बाबा आले नाही का?” तेव्हा अनुष्का म्हणते,”नाही. मी आले आहे.” बऱ्याच दिवसांनंतर लेकीला पाहून शिल्पाच्या अश्रूंचा बांध फुटतो, ती खूप रडायला लागते. तसंच लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.

त्यानंतर अनुष्का आईच्या लूकचं कौतुक करताना दिसत आहे. शेवटी शिल्पा ‘बिग बॉस’ला रिलीज करण्याची विनंती करते. रिलीज होताच ती जोरात ओरडत अनुष्काला घट्ट मिठी मारून तिच्या गालावर किस करते. तेव्हा अनुष्का मराठीत बोलते, “मम्मा, मी मेकअप लावलाय यार.” तरीही शिल्पा अनुष्काच्या गालावर किस करताना दिसत आहे. मायलेकीच्या हा सुंदर प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला कधीच माफ करणार नाही…”, चाहत पांडेची आई अविनाश मिश्रावर भडकली, ‘स्त्रीलंपट’चा टॅग देत म्हणाली…

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’मधील गाण्यावर डान्स करत ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी नवीन वर्षाचं केलं स्वागत, शुभेच्छा देत अभिनेत्री म्हणाल्या…

शिल्पा शिरोडकरची लेक काय करते?

शिल्पाची लेक अनुष्का रंजीतने स्कॉटलँडमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच २०२१मध्ये तिने नॉर्थ लंडन कॉलेजमध्ये पदवी घेतली होती. अनुष्का पल्स क्रिएटिव्ह कलेक्टिव कंपनीची फाउंडिंग डायरेक्टर आहे. अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 shilpa shirodkar emotional after met daughter watch promo pps