Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात आता फक्त सात सदस्य बाकी राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, रजत दलाल, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, ईशा सिंह या सात सदस्यांपैकी कोण विजयी होणार? सध्या याचीच चर्चा रंगली आहे. अशातच या सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी खास पत्र पाठवलं आहे; जे वाचून सदस्य भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर नुकताच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्दर्शक आणि ‘बिग बॉस’चं घर डिझाइन करणारे ओमंग कुमार सदस्यांचं पत्र घेऊन आलेले पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये ओमंग यांनी चुम दरांगला तिच्या बहिणीचं, शिल्पा शिरोडकरला तिच्या नवऱ्याचं आणि करणवीर मेहराला त्याचा आईचं पत्र देताना दिसत आहे. यावेळी शिल्पा शिरोडकर ढसाढसा रडत नवऱ्याचं पत्र वाचताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
शिल्पा शिरोडकर नवऱ्याचं पत्र पाहून खूप आनंदी होते आणि म्हणते, “माझा अॅप्स”. तेव्हा ओमंग कुमार विचारतात, “कोण?” त्यावर शिल्पा म्हणते, “माझा नवरा.” त्यानंतर शिल्पा रडत नवऱ्याचं पत्र वाचते, “तुला सगळ्यांची खूप आठवण येत आहे, हे मला माहीत आहे. मला तुझी खूप आठवण येत आहे. तू ‘बिग बॉस’मध्ये गेल्यापासून मी नीट झोपतंही नाही. जेवणाची चव गेलीये. घराला घरपण नाहीये.” नवऱ्याने लिहिलेलं हे पत्र वाचून शिल्पा भारावून गेली आहे. तसंच करणवीर मेहरादेखील आईने लिहिलं पत्र वाचून भावुक झाला आहे.
हेही वाचा – शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे चार दिवस बाकी राहिले आहेत. १९ जानेवारीला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. पण त्याआधी शिल्पा शिरोडकरचा पत्ता कट झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.