Bigg Boss 18: ‘बिग बॉस मराठी’च्या १८व्या पर्वाचा आता १२वा आठवडा सुरू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये ‘टाइम गॉड’ असलेल्या श्रुतिका अर्जुनला एक महत्त्वाचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे विवियन डिसेना, चाहत पांडेसह घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले. नॉमिनेशन टास्कमध्ये नेमकं काय घडलं? १२व्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी कोण-कोण नॉमिनेट झालं? जाणून घ्या…

ख्रिसमसचं औचित्य साधून नॉमिनेशन टास्क तशाप्रकारे देण्यात आला होता. प्रत्येक सदस्याला एक घर देण्यात आलं होतं. या घराच्या खिडकीमध्ये श्रुतिका अर्जुनला गिफ्टचे बॉक्स ठेवायचे होते. गिफ्टचे बॉस हे सदस्यांची लाइफ लाइन होती. श्रुतिकाला एक, दोन, तीन, चार, पाच असे गिफ्ट्सचे बॉक्स द्यायचे होते. त्याप्रमाणे श्रुतिकाने सर्वाधिक म्हणजे पाच गिफ्ट्सचे बॉक्स करणवीर मेहरा, चुम दरांगला दिले. तर श्रुतिकाने चार गिफ्ट्सचे बॉक्स शिल्पा शिरोडकर आणि चाहत पांडेला दिले. तसंच तीन गिफ्ट्सचे बॉक्स रजत दलाल, कशिश कपूर आणि दोन गिफ्ट्सचे बॉक्स विवियन डिसेना, सारा अरफीन खान दिले होते. त्यानंतर प्रत्येकी एक-एक गिफ्टचे बॉक्स श्रुतिकाने अविनाश मिश्रा, ईशा सिंह यांना दिले. त्यानंतर सदस्यांना नॉमिनेट करत असलेल्या दोन सदस्यांचे गिफ्टचे बॉक्स तोडायचे होते. ज्याच्या खिडकीमध्ये गिफ्ट्सचे बॉक्स शिल्लक राहणार नाहीत, तो सदस्य नॉमिनेट होणार होता.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी

कोणत्या सदस्याने कोणाला नॉमिनेट केलं?

अविनाशने कशिश-सारा, करणने सारा-ईशा, ईशाने चाहत-कशिश, रजतने चाहत-विवियन, विवियनने चाहत-कशिश, शिल्पाने अविनाश-रजत, चुमने विवियन-रजत, कशिशने चाहत-शिल्पा, चाहतने रजत-चुम, साराने शिल्पा-करणवीर, अशा प्रकारे प्रत्येक सदस्याने दोन इतर सदस्याला नॉमिनेट केलं. यावेळी सारा, ईशा, कशिश, अविनाश, विवियन, रजत आणि चाहत घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण एविक्ट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये

हेही वाचा – Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सक्सेस पार्टीत महेश कोठारेंचा ‘झपाटलेला’ चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, गेल्या आठवड्यात मिड वीक एविक्शन आणि डबल एविक्शन पाहायला मिळालं. मिड वीक एविक्शनमध्ये दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. त्यानंतर डबल एविक्शनमध्ये एडिन रोज, यामिनी मल्होत्रा बेघर झाल्या.

Story img Loader