Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १४वा आठवडा सुरू आहे. लवकरच आता अंतिम आठवडा सुरू होणार आहे. पण त्याआधी ‘मिड वीक एविक्शन’ झालं आहे. प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे एका सदस्याचा प्रवास आता संपला आहे.
७ जानेवारीच्या भागात नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तीन सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले ते म्हणजे रजत दलाल, चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन. ‘टाइम बुथ’चा नॉमिनेशन टास्क दिला होता. यावेळी तीन टीम करण्यात आल्या होत्या. एका टीममध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दुसऱ्या टीममध्ये विवियन डिसेना, ईशा सिंह, अविनाश मिश्रा आणि तिसऱ्या टीममध्ये रजत दलाल, श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे अशा टीम ‘बिग बॉस’ने केल्या होत्या. या प्रत्येक टीमला १३ मिनिट टाइम बुथमध्ये बसायचं होतं. पण यावेळी रजतच्या टीमने नियमाचं उल्लंघन केल्यामुळे थेट नॉमिनेट करण्यात आलं. आता यामधून एक सदस्य एविक्ट झाल्याचं समोर आलं आहे.
‘बिग बॉस तक’च्या माहितीनुसार, श्रुतिका अर्जुन बेघर झाली आहे. ‘मिड वीक एविक्शन’ दरम्यान प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे श्रुतिका अर्जुन एविक्ट झाली आहे. या ‘मिड वीक एविक्शन’नंतरही वीकेंडच्या वारला आणखी एक एविक्शन होणार आहे. त्यामुळे अंतिम आठवडा सुरू होण्याआधी श्रुतिका अर्जुननंतर रजत, चाहतमधील कोणता सदस्य घराबाहेर होतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
? Shrutika Arjun has been EVICTED from Bigg Boss 18 house in Mid week eviction.
— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) January 8, 2025
There is going to be another eviction in Weekend Ka Vaar.
दरम्यान श्रुतिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती एक अभिनेत्री आहे. तिने तमिळ चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. २००२मध्ये ‘श्री’ आणि ‘एल्बम’ यांसारख्या चित्रपटातून श्रुतिकाने तमिळ सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिला बरंच यश मिळालं. पण काही काळाने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. पण ‘कूकू विद कोमाली सीझन ३’मधून तिने पुनरागमन केलं.
हेही वाचा – Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
१९८७मध्ये श्रुतिकाचा जन्म झाला होता. तिचे आजोबा थेंगई श्रीनिवासन प्रसिद्ध तमिळ अभिनेते होते. श्रुतिकाने संपूर्ण शिक्षण तमिळनाडूमध्ये केलं होतं. त्यानंतर कमी वयात तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तिच्या नवऱ्याचं नाव अर्जुन राज असं आहे. ‘फॅमिली वीक’मध्ये अर्जुन आणि तिचा मुलगा पाहायला मिळाला होता.