Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या ११वा आठवडा सुरू आहे. नुकताच ‘टाइम गॉड’साठी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सदस्यांच्या दोन टीम करण्यात आल्या होत्या. जी टीम टास्क जिंकणार त्या टीममधील सदस्य ‘टाइम गॉड’ होण्यासाठी उमेदवार होणार होते. ‘ए टीम’मध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन आणि दिग्विजय राठी होता. तर ‘बी टीम’मध्ये रजत दलाल, एडिन रोज, चाहत पांडे, कशिश कपूर, यामिनी मल्होत्रा आणि सारा अरफीन खान हे सदस्य होते.
‘टाइम गॉड’च्या टास्कचा संचालक अविनाश मिश्रा होता. या दोन्ही टीमला संचालक अविनाश मिश्राचं चित्र काढायचं होतं. जे चित्र अविनाशला आवडेल, त्या चित्रावर अविनाश सही करून विजयी घोषित करणार, असा टास्क होता. यावेळी साराने अविनाशचं सुंदर चित्र रेखाटत होती. त्यावेळी करणने पूर्ण रंग साराच्या चित्रावर फेकला. त्यामुळे पूर्ण टास्कमध्ये दोन्ही टीम इतरांचं चित्र मिटवण्याचा प्रयत्न करत होते. या टास्कमध्ये सर्व सदस्य एकप्रकारे होळी खेळताना दिसले. शेवटी अविनाशने ‘ए टीम’च्या चित्रावर जाऊन सही करून त्यांना विजयी घोषित केलं. त्यामुळे पुढचा ‘टाइम गॉड’चा टास्कचा करणवीर मेहरा, विवियन डिसेना, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन आणि दिग्विजय राठी यांच्यात पार पडणार आहे.
सहा सदस्यांमध्ये होणाऱ्या ‘टाइम गॉड’च्या टास्कमध्ये सदस्यांना आपापल्या टोपलीत जास्तीत जास्त फळ ठेवायची आहेत. या टास्कमध्ये श्रुतिका अर्जुनने बाजी मारल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस तक’ या एक्स अकाउंटवरून दिलेल्या माहितीनुसार, श्रुतिका अर्जुन नवीन ‘टाइम गॉड’ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रुतिका दोन आठवडे नॉमिनेशनपासून सुरक्षित राहणार आहे.
? BREAKING! Shrutika Arjun is the new TIME GOD of Bigg Boss 18 house and gets 2 week immunity from nomination
— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) December 17, 2024
दरम्यान, ११व्या आठवड्यात एकूण आठ सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार आहे. यामिनी मल्होत्रा, रजत दलाल, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, दिग्विजय सिंह राठी, चुम दरांग आणि श्रुतिका अर्जुन या सदस्यांपैकी आता कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.