Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे आतापर्यंत सात आठवडे सुरळीत पार पडले आहेत. आता आठवा आठवडा सुरू झाला आहे. नुकतीच एलिस कौशिक घराबाहेर झाली. प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे एलिस एलिमिनेट झाल्याचं सलमान खानने वीकेंड वारला जाहीर केलं. आता आठव्या आठवड्यात करणवीर मेहरा, विवियन डिसेनासह सात सदस्यांवर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.
नुकतीच आठव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. ही नॉमिनेशन प्रक्रिया मैत्रीमध्ये होती. म्हणजे दोन खास मित्र-मैत्रिणीमध्ये एकच जण नॉमिनेट होऊन दुसऱ्याला सुरक्षित करायचं होतं. सर्वात आधी श्रुतिका अर्जुन आणि चुम दरांगला कन्सेशन रुममध्ये बोलावलं. तेव्हा श्रुतिकाने स्वतःला नॉमिनेशनमध्ये टाकून चुमला सुरक्षित करण्यासाठी वाद घातला. अखेर श्रुतिकाच घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली.
त्यानंतर ईशा सिंह- अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर-विवियन डिसेना, करणवीर मेहरा-तजिंदर बग्गा, सारा खान-कशिश कपूर अशा जोड्या गेल्या. यावेळीही या जोड्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यामधील दोन जोड्यामधील चारही जण नॉमिनेट झाले. करणवीर मेहरा-तजिंदर बग्गा, सारा खान-कशिश कपूर या दोन जोड्यांनी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण एकमेकांची मतं दोन्ही जोड्यातील सदस्यांना पटतं नव्हती. त्यामुळे दोन्ही जोड्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाल्या आहेत.
हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी २’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, भावुक पोस्ट करत मागितली माफी, म्हणाली…
करणवीर मेहरा, विवियन डिसेनासह एकूण सात जण नॉमिनेट झाले आहेत. करणवीर, विवियनबरोबर अविनाश मिश्रा, तजिंदर बग्गा, श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर, सारा अली खान या सात जणांमधून कोण घराबाहेर होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच आठव्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – Video: “तुम्ही बेअक्कल लोक आहात…”, मुंबईच्या ट्रॅफिकमधील ‘ती’ कृती पाहून गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली…
दरम्यान, आतापर्यंत ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातून एलिस कौशिकसह सात सदस्य बाहेर गेले आहेत. एलिसच्या आधी गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, शहजादा धामी, अरफीन खान हे सदस्य घराबाहेर झाले होते. दुसऱ्या बाजूला दिग्विजय सिंह राठी ‘टाइम गॉड’ झाल्यापासून विवियन डिसेनाच्या टीमने बंड पुकारल्याचं पाहायला मिळत आहे. विवियन, अविनाश, तजिंदर बग्गा यांनी दिग्विजय ‘टाइम गॉड’ असेपर्यंत कामं न करण्याचा बंड केला आहे. आता त्यांच्याबरोबरीने रजत दलालने देखील हाच पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.