प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा परत येत आहे. यावेळी बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व आणखी भव्य ठरणार आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आपल्या खास अंदाजात यंदाही शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. ‘बिग बॉस १८’ हा शो नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी भरपूर नाट्य, ट्विस्ट्स, आणि सरप्राइजेस घेऊन येणार आहे. चला, जाणून घेऊया यावर्षीच्या ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रीमियरची तारीख, वेळ, आणि संभाव्य स्पर्धकांची यादी!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रीमियरची तारीख, वेळ आणि कुठे होणार प्रसारित?

बिग बॉस १८ चे ६ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता ग्रँड प्रीमियर होईल. हा शो नेहमीप्रमाणे कलर्स टीव्ही वाहिनीवर प्रसारित होईल, तर डिजिटल प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर देखील उपलब्ध असेल. जिओ सिनेमा वर प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे लाइव्ह एपिसोड्स आणि मागील एपिसोड्स पाहता येतील, ज्यामुळे शोचं अपडेट ठेवणं प्रेक्षकांसाठी सोपं होईल.

हेही वाचा…“आमच्यात जे काही…”, इरिनाबरोबरच्या बॉण्डिंगवर काय म्हणाला वैभव चव्हाण?

बिग बॉस १८ चं थीम -‘टाइम का तांडव’

यंदाच्या पर्वात निर्मात्यांनी एक नवीन आणि अनोखं थीम आणलं आहे, ज्याचं नाव आहे ‘टाइम का तांडव’. या थीममुळे शोमध्ये प्रचंड नाट्य निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. “इस बार घर में भूचाल आएगा, क्यूंकी बिग बॉस में टाइम का तांडव छाएगा!” अशी शोची टॅगलाइन आहे. घराच्या इंटिरियरमध्ये या थीमचा प्रभाव दिसेल, आणि याच थीमनुसार स्पर्धकांसमोर वेळेच्या आधारे अनेक आव्हाने असतील. यामुळे प्रेक्षकांसाठी हा शो अधिक रोमांचक ठरेल.

बिग बॉस १८ चे संभाव्य स्पर्धक

‘बिग बॉस १८’ च्या अधिकृत स्पर्धकांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु माध्यमांमध्ये काही नावं चर्चेत आहेत. यामध्ये लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा समावेश आहे. निया शर्मा, आकृती नेगी, दिग्विजय राठी, हर्ष बेनीवाल, जशवंत बोपन्ना, समीरा रेड्डी, करण वीर मेहरा, चाहत पांडे, अविनाश मिश्रा, आणि शेहजादा धामी अशी काही नावं संभाव्य स्पर्धक म्हणून पुढे येत आहेत.

हेही वाचा…अमिताभ बच्चन यांनी एकाच दिवशी ओढल्या होत्या २०० सिगारेट्स; व्यसनाबद्दल बिग बी म्हणालेले, “जे मिळेल ते…”

बिग बॉस १८ चे बक्षीस

यंदाच्या सिझनसाठी बक्षिसाची रक्कम सुमारे ५० लाख रुपये असण्याची शक्यता आहे, जी मागील सिझनइतकीच असेल. मागील सिझनमध्ये स्टॅन्डअप कॉमेडियन
मुनव्वर फारुकीने बिग बॉसची ट्रॉफी आणि बक्षीस रक्कम जिंकली होती. शोमध्ये विशेष ‘मनी टास्क्स’ असतात, ज्यामुळे स्पर्धकांच्या कामगिरीवर आधारित ही रक्कम वाढू किंवा कमी होऊ शकते.

हेही वाचा…“ती पद्धत म्हणजे बालिशपणा…”, शाहरुख खानने आमिर खानवर केलेली टीका; अभिनेत्याने दिलेलं असं उत्तर की…

बिग बॉस १८ मध्ये काय अपेक्षित आहे?

यंदाच्या पर्वात निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे, हा सीझन पूर्वीपेक्षा अधिक नाट्यमय, अनपेक्षित ट्विस्ट्सने भरलेला असेल. “टाइम का तांडव” या थीममुळे घरातील आव्हाने अधिक रोमांचक ठरतील. विविध स्पर्धकांच्या प्रवेशामुळे आणि नव्या आव्हानांमुळे यंदाचा सिझनमधील नाट्य अविस्मरणीय ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 start date show time contestant list and new theme know more details psg