Bigg Boss 18 : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानचा पहिला प्रोमो आल्यापासून प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ६ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरू होणार आहे. रात्री ९ वाजता ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे. त्यामुळे सर्वत्र या पर्वातील स्पर्धकांविषयी बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी विचारणा झाल्याचं समोर आलं होतं. पण यावर रुपालीने कोणतंही भाष्य केलं नाही. आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने सलमान खानच्या लोकप्रिय शोची ऑफर नाकारल्याचं समोर आलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकलेली ही अभिनेत्री हिंदी मालिकाविश्वात खूप लोकप्रिय आहे. तिने काही हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘सोनी टीव्ही’वरील ‘पुकार दिल से दिल तक’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही मराठी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सायली साळुंखे आहे.

हेही वाचा – Video: फुग्यांनी सजलेली गाडी, फुलांचा वर्षाव अन्…, मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचं ‘असं’ झालं स्वागत, पाहा व्हिडीओ

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या पहिल्या पर्वाच्या सुरुवातीला सायली साळुंखे दिसली होती. तिने जयदीपची गर्लफ्रेंड ज्योतिकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती हिंदी मालिकेत पाहायला मिळाली. अशा लोकप्रिय सायलीला ‘बिग बॉस’च्या १८व्या ( Bigg Boss 18 ) पर्वाची ऑफर देण्यात आली होती. पण तिने ती नाकारली.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, सायलीला ‘बिग बॉस’च्या १८व्या ( Bigg Boss 18 ) पर्वासाठी विचारण्यात आलं होतं. पण तिने सध्यातरी करण्यास उत्सुक नसल्याच सांगितलं. एवढंच नव्हे तर सायलीने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होणार असल्याची बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा – Video: अभिजीत सावंतने निक्की तांबोळीची केली जबरदस्त नक्कल, व्हिडीओ पाहून तुम्हाला होईल हसू अनावर

Sayli Salunkhe Story

हेही वाचा – Bigg Boss 18 : सलमान खानच्या बहुचर्चित ‘बिग बॉस’साठी सहा स्पर्धकांवर शिक्कामोर्तब, ‘हा’ मराठी चेहरा झळकणार

‘बिग बॉस १८’ची थीम

यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात बरंच वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या ( Bigg Boss 18 ) पर्वाची थीम आहे. त्यामुळे नेमकं शोमध्ये काय असणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.