Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा फिनाले जसं जसा जवळ येत आहेत. तसं सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ट्रॉफी जिंकण्यासाठी जबरदस्त खेळताना दिसत आहे. अशातच १०व्या आठवड्यातून बेघर झालेल्या सदस्याचं नाव समोर आलं आहे; जे वाचून धक्काच बसेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१०व्या आठवड्यात एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. दिग्विजय सिंह राठी, तजिंदर सिंह बग्गा, एडिन रोज, करणवीर मेहरा, चाहत पांडे आणि विवियन डिसेना हे सदस्य नॉमिनेट झाले होते. पण, काही दिवसांपूर्वी या सहा जणांमधील एका सदस्याला घराबाहेर जाण्यापासून सुरक्षित करण्याचा टास्क दिला होता. या टास्कमध्ये घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट न झालेले सदस्य खेळले. यावेळी चुम दरांगने बाजी मारली. तिने आपल्या जबरदस्त खेळीने करणवीर मेहराला सुरक्षित केलं. त्यामुळे पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. याच पाचमधील एक सदस्य अखेर घराबाहेर झाला आहे.
हेही वाचा – Video: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवोदित कवयित्री म्हणून सन्मान, पोस्ट करत म्हणाली, “हे दुर्मिळ…”
‘बिग बॉस तक’ने दिलेल्या माहितीनुसार, तजिंदर बग्गा याचा प्रवास संपला आहे. गेल्या बऱ्याच आठवड्यापासून तजिंदर बग्गा घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होत होता. पण, एलिमिनेशन होतं नव्हतं. अखेर तजिंदर बग्गा एलिमिनेट झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आनंद झाला आहे.
? BREAKING & EXCLUSIVE!
— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) December 13, 2024
Finally, Tajinder Bagga is EVICTED from the Bigg Boss house.
Retweet – If Happy!!!
तजिंदर बग्गा कोण आहे?
तजिंदर पाल सिंह बग्गा भाजप नेता असून २०२०मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक लढली होती. वयाच्या चौथ्या वर्षी बग्गाने राष्ट्रीय स्वंयसेवक संघामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वयाच्या १४व्या वर्षी पहिल्यांदाच तजिंदर बग्गा जेलमध्ये गेला.
राजकारणा व्यतिरिक्त तजिंदर बग्गाचा स्वतःचा व्यवसाय आहे. T-Shirt Bhaiyya नावाचा ब्रँड बग्गाकडे आहे. हे ऑनलाइन स्टोअर असून येथे प्रिंट असलेले टी-शर्ट, कुर्ता, जॅकेट्स, ज्वेलरी अशा बऱ्याच वस्तू मिळतात. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होण्याआधी तजिंदर बग्गाने Kulhad Briyani: Indian First Jhatka Biryani Brand याची घोषणा केली होती.
हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, साकारणार खलनायकाची भूमिका
दरम्यान, १३ डिसेंबरच्या भागात रेशनसाठी टास्क झाला. या टास्कमध्ये सदस्यांना खरं बोलल्यावर रेशन मिळत होतं. यावेळी करणवीरने चुमसाठी असलेल्या भावना व्यक्त केल्या. तर अविनाश मिश्राने ईशा सिंहबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यामुळे आता ते लव्ह कनेक्शन किती काळ ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात पाहायला मिळतंय, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.