Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला ६ ऑक्टोबरपासून जबरदस्त सुरुवात झाली आहे. १८ सदस्यांसह एक गाढव या पर्वात सहभागी झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून सदस्यांचे एकमेकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. अशातच भाजपा नेते तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी लोकप्रिय दिवंगत गायक सिद्धू मुसेवालासंबंधित एक खुलासा केला आहे.
तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी गुणरत्न सदावर्तेंशी गप्पा मारताना सिद्धू मुसेवाला संदर्भात सांगितलं. ते म्हणाले, “रुद्रा नावाचा माझा एक मित्र ज्योतिषी आहे. तुम्हाला पोलिसांचं पंजाबवालं प्रकरण माहित असेलच. ६ मे २०२२ हे प्रकरण झालं होतं. १९ मे २०२२ दिल्ली ऑफिसमध्ये मी आणि रुद्रा बसलो होतो. तर मी त्याचे सिद्धू मुसेवालाबरोबर फोटो पाहिले. पंजाबचे जे गायक असतात ना ते जास्त हिंदू धर्मावर विश्वास ठेवायचे नाही.”
“तर मी माझ्या मित्राचा फोटो त्याच्याबरोबर पाहिला आणि म्हटलं, तू सिद्धू मुसेवालाबरोबर का बसला होता? तो म्हणाला, त्याला त्याची कुंडली मला दाखवायची होती. मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण सिद्धू या गोष्टी मानत होता. तो म्हणाला, भाई मी त्याच्याबरोबर चार तास बसलो होतो. मी विचारलं, तू काय बोललास? मी त्याला सांगितलं, तू देश सोडून जा नाहीतर तुला धोका आहे. तुझ्यावर हल्ला होऊ शकतो. पण आम्ही असं म्हणू शकत नाही की तुझा जीव जाऊ शकतो. त्यामुळे मी सावध केलं. तू देश सोड. ८, ९ तारेखला सिद्धू देश सोडून जात होता. मी विचार केला, एक माणूस दिवसाला ५० लाख रुपये कमाई करत होता. महिन्याला १०-१५ शो करून ७-८ करोड कमवत होता. तो एका ज्योतिषावर विश्वास ठेऊन देश सोडून का शकतो? मी तर गेलो नसतो. पण ८ दिवसांनंतर सिद्धू मुसेवालाचा मृत्यू झाला. मी माझ्या मित्राला सर्वात आधी फोन केला. म्हटलं भाई, जे काही माझ्याबद्दल असेल ते मला पण सांग. मी त्यानंतर डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवू लागलो,” अस तजिंदर बग्गा म्हणाले.
हेही वाचा – Video : सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंतने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, ‘बिग बॉस’ची ट्रॉफी ठेवली बाप्पाच्या चरणी
दरम्यान, २९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाही तर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्यांच्या गाण्यांची अक्षरशः वेडी होती आणि अजूनही आहेत.
‘बिग बॉस १८’मधील १८ स्पर्धक
चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तेजिंदर पाल सिंह बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरंग, करण मेहरा, रजत दलाल, मुस्कार बामने, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंह, हेमा शर्मा, विवियन डिसेना, एलिस कौशिक आणि गुणरत्न सदावर्ते हे १८ सदस्य सहभागी झाले आहेत.