Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे दोन आठवडे बाकी राहिले आहेत. १०० दिवसांचा हा प्रवास लवकरच संपणार आहे. सध्या घरात फक्त १० सदस्य राहिले आहेत. या १० जणांमधून कोण-कोणत्या सदस्यांची महाअंतिम फेरीमध्ये जाण्याची संधी हुकतेय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेल्या वर्षा उसगांवकरांनी शिल्पा शिरोडकरचं कौतुक केलं. तसंच त्यांनी घरातील इतर सदस्यांच्या खेळावर प्रतिक्रिया दिली. वर्षा उसगांवकर नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील सदस्यांबद्दल भाष्य केलं. ‘बिग बॉस’चं १८वं पर्व त्या पाहत आहेत. वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, मी ‘बिग बॉस’चे बरेच पर्व पाहिले आहेत. यंदाच पर्व चांगलं आणि पाहण्याजोग आहे. शिल्पा शिरोडकर शांतपणे स्वतःला हाताळत आहे. त्यामुळे मला ती खूप आवडते. ती बऱ्याचदा भावुक झाली. पण इतकं भावनिक होण्याची गरज नाही. अनेकदा शिल्पाचं भावुक होणं अनावश्यक वाटतं. पण भावुक होणं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. त्यामुळे मला तिच्यावर टीका करायची नाही. पण, मला वाटतं तिला रडण्याची गरज नाही.
हेही वाचा – दोन लोकप्रिय मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, नेटकरी म्हणाले, “एवढ्या लवकर का संपवली?”
पुढे वर्षा उसगांवकरांना ‘बिग बॉस १८’च्या ट्रॉफीच्या अधिक जवळ कोण? असं विचारलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाल्या, “कोण जिंकेल हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे. पण मला वाटतं, विवियन ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी घेण्यास सक्षम आहे. करणवीर मेहरा यासाठी प्रबळ दावेदार आहे. पण, रजत दलालकडेही जिंकण्यासाठी संधी आहे. तो खूप तापट आहे. कधीकधी मर्यादा ओलांडतो. खूप उद्धटपणे बोलतो. मात्र त्याच्याकडे जिंकण्याची संधी आहे.”
त्यानंतर शिल्पा शिरोडकरला रजतने दिलेल्या वागणुकीवर वर्षा उसगांवकरांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, रजत ज्या पद्धतीने शिल्पाशी बोलतो ते मला आवडत नाही. एकेरी भाषेत तो तिच्याशी बोलतो. त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या स्त्रीशी असं वागणं चुकीच आहे. वयाने मोठ्या असलेल्या प्रत्येक स्त्रीला आदर देणं आवश्यक आहे. याशिवाय वर्षा यांनी चाहत पांडे आणि ईशा सिंह चांगलं खेळत असल्याचं सांगितलं. तसंच अविनाशचं वागणं कधीकधी निंदनीय आणि बालिश असल्याचं त्या म्हणाल्या.
हेही वाचा – Video: न्यू इअरचं सेलिब्रेशन करून रणबीर कपूर-आलिया भट्ट राहासह मुंबईत परतले, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
वर्षा उसगांवकरांनी करणवीर मेहराचदेखील कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “करणवीर ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ आहे. तो काही वेळेला खूप समजूदारपणाने वागतो. तितकाच तो विनोदी आहे.”