Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे १० दिवस बाकी राहिले आहेत. १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे सध्या उर्वरित सदस्यांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. नुकताच ‘तिकीट टू फिनाले’ टास्क पार पडला. यावेळी ‘बिग बॉस’च्या इतिहासात न घडलेली गोष्ट घडली आहे. नेमकं काय झालं? जाणून घ्या…

८ जानेवारीच्या भागात पहिला ‘तिकीट टू फिनाले’ टास्क पार पडला. या टास्कमध्ये सुरक्षित असलेले सदस्य विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि चुम दरांग खेळले. ‘तिकीट टू फिनाले’च्या टास्कमध्ये एक पक्षी होता. जो अंतिम आठवड्यापर्यंत प्रवास करत होता. पण तो जखमी झाला. त्यामुळे सदस्यांना अंतिम आठवड्यापर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष्याची अंडी व्यवस्थितरित्या गोळा करायची होती. यात अंड्याचा दुकानदार आणि संचालक रजत दलालला करण्यात आलं होतं. यावेळी सर्वात आधी मोठं अंड रजतकडे जो सदस्य देईल, त्या सदस्याला रजत त्याच्या मताने खरी अंडी देणार होता. या ‘तिकीट टू फिनाले’ टास्कच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या.

Ajit Pawar On Raigad DPDC Meeting
Ajit Pawar : महायुतीत धुसफूस? ‘डीपीडीसी’च्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर; अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही आमदारांना…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
social security schemes are not free gifts jharkhand speaker mahato
उद्योगपतींना पायघड्या घालताना ‘रेवडी’चा विषय नाही
karan veer mehra second wife Nidhi Seth talks about husband sandip kumar
अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पतीबद्दल म्हणाली, “तो खूपच…”
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Bigg Boss Marathi fame Ankita prabhu Walawalkar share special post after visit akkalkot
“आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?” ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”

हेही वाचा – Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

करणवीर सोडून प्रत्येक सदस्य स्वतःसाठी खेळताना दिसला. करणवीर हा चुमसाठी खेळत होता. यामध्ये सर्वाधिक अंडी विवियन आणि करणने गोळा केली. त्यामुळे पहिला ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क विवियन आणि चुमने जिंकला. पण यावेळी विवियन आक्रमकपणे खेळताना दिसला. विवियनची तिचं वृत्ती ‘तिकीट टू फिनाले’च्या दुसऱ्या टास्कमध्ये पाहायला मिळाली. या टास्कमध्ये एक स्ट्रेचर देण्यात आलं होतं. या स्ट्रेचरमध्ये गोल्डन आणि सिल्व्हर रंगाच्या छोट्या विटा जमा करायच्या होत्या. गोल्डन विटा विवियनच्या आणि सिल्व्हर विटा चुमच्या होत्या. त्यामुळे विवियन, चुमच्या समर्थकांना या विटा गोळा करून स्ट्रेचरमध्ये टाकायच्या होत्या. ते स्ट्रेचर एका बाजूला विवियन तर दुसऱ्या बाजूला चुमला पकडायचं होतं. स्ट्रेचरमध्ये ज्या रंगाच्या सर्वाधिक विटा असणार होत्या, तो सदस्य ‘तिकीट टू फिनाले’ जिंकणार होता.

हेही वाचा – Bigg Boss 18: २१ लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने चाहत पांडेच्या बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा, फोटो शेअर करत म्हणाला…

करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, श्रुतिका अर्जुन चुमसाठी तर अविनाश मिश्रा, ईशा सिंह, रजत हे विवियनला पाठिंबा देताना दिसले. या टास्कचा संचालक रजत दलालचं होता. तो आपल्या आवडत्या सदस्यांला मदत करू शकत होता. त्यामुळे तो विवियनच्या बाजूने खेळताना दिसला. ‘तिकीट टू फिनाले’च्या दुसऱ्या टास्कच्यावेळी विवियन खूप आक्रमक पद्धतीने खेळताना पाहायला मिळाला. त्यामुळे चुम डोक्यावर पडली आणि जखमी झाली. अखेर शेवटी विवियन डिसेना ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकला. पण त्याने ‘तिकीट टू फिनाले’ नाकारलं. कारण त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे. त्यानंतर ‘बिग बॉस’ने चुमला ‘तिकीट टू फिनाले’ घेण्याची संधी दिली. पण, तिने देखील स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे ‘तिकीट टू फिनाले’ जिंकूनही न घेणं, हे ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे.

हेही वाचा – “खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १४वा आठवडा सुरू आहे. रजत दलाल, चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन नॉमिनेट झाले आहेत. या सदस्यांमधून आता कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader