Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात दररोज वाद होणार नाहीत, हे तर अशक्यच आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सदस्यांमध्ये वाद होतं असतात. ‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरू झाल्यापासून विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा एकमेकांविरोधात खेळण्यासाठी बिग बॉसचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अखेर याला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. विवियन आणि करणवीरमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नुकताच याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स टीव्ही’च्या अधिकृत सोशल मीडियावर विवियन व करणवीरमधील वादाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शिल्पा शिरोडकर, विवियन डिसेना, करणवीर मेहरा चर्चा करताना दिसत आहेत. याच वेळी शिल्पा विवियनला म्हणते, “तू जर मेंटोरशिपची जागा घेतली असशील तर फेअर राहा.” विवियन म्हणतो की, मी कुठलीही मेंटोरशिपची जागा वगैरे घेतली नाहीये. त्यानंतर करणवीर विवियनला म्हणतो, “मला तुझ्याशी एकदा बोलायचं आहे.” पण, विवियन म्हणतो, “मला बोलायचं नाहीये.”

पुढे करणवीर आणि विवियन एका कोपऱ्यात जातात. तेव्हा करण विवियनला म्हणतो, “तुला माहितीये ना तुझं कुटुंब हे सगळं बघत आहे.” यावर विवियन म्हणतो की, मी जे काही करतोय ते मला माहित आहे. मी माझा मुद्दा ठेवला आहे.

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापनंतर ‘हा’ लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख विचारताच म्हणाला…

त्यानंतर विवियन करण सतत कुटुंबाला मधे घेऊन येत असल्यामुळे अविनाश मिश्रा, ईशा सिंहसमोर खंत व्यक्त करताना दिसत आहे. तेव्हा विवियन म्हणतो, “तो प्रत्येकवेळेस माझ्या कुटुंबाला मधे आणत आहे.” तर दुसऱ्या बाजूला करणवीर म्हणतो, “मी त्याला म्हणालोय, तो आता माझा मित्र वगैरे कोणीही नाहीये. एक नंबरचा मुर्ख माणूस आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेमुळे रजत दलाल आणि अविनाश मिश्रामध्ये जोरदार भांडण, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…

दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात घरातील दोन सदस्य बेघर झाले. तिसऱ्या आठवड्याच्या मधेच मुस्कान बामने हिला घरातील सदस्यांनी बहुमताने घराबाहेर केलं. त्यानंतर वीकेंड वारला प्रेक्षकांच्या मतानुसार नायरा बनर्जी एविक्ट झाली. आतापर्यंत ‘बिग बॉस १८’मधून चार सदस्य बेघर झाले आहेत. मुस्कान आणि नायराच्या आधी हेमा शर्मा, गुणरत्न सदावर्ते हे दोघं घराबाहेर झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 vivian dsena and karan veer mehra fight watch promo pps