Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात विवियन डिसेना आणि करणवीर मेहराची चांगली मैत्री पाहायला मिळेल, असं काहीस सुरुवातीला चित्र निर्माण झालं होतं. पण तसं काही पुढे घडलं नाही. विवियन आणि करणवीर दोघं एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसले. आज, १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. पण त्यापूर्वी घरात बऱ्याच गोष्टी घडल्या. यावेळी विवियना करणवीरवर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याआधी आणखी एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांच्या तिखट प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सदस्यांचे समर्थक आले होते. त्यानंतर रोस्ट म्हणजे एकमेकांची खिल्ली उडवण्याचा कार्यक्रम झाला. प्रत्येक सदस्याने इतराला रोस्ट केलं. पण यावेळी करणवीर मेहराने मर्यादा ओलांडल्याचा आरोप विवियन डिसेनाने केला. तो करणवर भडकला. नेमकं करणवीर मेहरा काय म्हणाला? जाणून घ्या…
हेही वाचा – Bigg Boss 18: “ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली…
करणवीर विवियनची खिल्ली उडवताना म्हणाला की, विवियन डिसेना तुला लहान मुलंदेखील ओळखतात. पण तुला स्वतःची मुलगी ओळखू शकली नाही. तर काम्या म्हणाली, या विवियनला मी ओळखत नाही. मग या विवियनला ओळखत तरी कोण? यावर विवियनने लगेच आक्षेप घेतला आणि म्हणाला, “हे चांगलं नाहीये.” त्यानंतर करणने लगेच माफी मागितली. तरीही विवियनला पटलं नाही. तो म्हणाला की, हे खूप वाईट आहे. दोन वर्षांचं मुलं तसंही कोणाला जास्त ओळखत नाही. हे वैयक्तिक झालं आहे. तेव्हा करण म्हणाला, “मस्ती करतोय.” तरीही विवियन स्वतःचं रोस्टिंग ऐकण्यासाठी तयार नव्हता. यावेळी ईशाने करणला विचारलं की, हे तू लिहिलं आहेस का? तेव्हा तो म्हणाला, “मी नाही. मला तसं लिहून दिलं आहे.”
हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला गर्लफ्रेंड नाहीतर…”, चुम दरांगने करणवीर मेहराची उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ
करणवीरने रोस्ट केल्यानंतर तो सगळ्यांना भेटला. त्यावेळी तो विवियनला भेटायला गेला. पण विवियनने मनाई केली. विवियन म्हणाला, “जे केलंस ते वैयक्तिक होतं. अजिबात चांगलं नव्हतं. मी असं केलं नसतं. मी कुठल्याच गोष्टी जास्त मनाला लावून घेत नाही. पण वैयक्तिक असेल तर वाईट वाटतं.” रोस्टिंगचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व सदस्य घरात आले. तेव्हा विवियन रागारागात घरात आला आणि त्याने त्याची बॉटल डायनिंग टेबलवर फेकून दिली.
हेही वाचा – ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, ‘बिग बॉस मराठी’शी आहे खास कनेक्शन
दरम्यान, आपल्या आवडत्या सदस्याला जिंकवण्यासाठी चाहते भरभरून व्होटिंग करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस खबरी’नुसार, शनिवारी ११.४० वाजेपर्यंत विवियन डिसेनाला सर्वाधिक व्होटिंग मिळत असल्याचं पाहायला मिळालं. विवियनला ३० टक्के, करणला २९ टक्के, रजतला २५ टक्के, चुमला १० टक्के, अविनाशला ४ टक्के आणि ईशा २ टक्के व्होटिंग मिळालं आहे.