Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व संपलं आहे. १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे सहा सदस्य अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले. पण प्रेक्षकांच्या भरघोस मतांनी करणवीर मेहरा ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला. त्यामुळे सध्या करणवीरला इतर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसंच काहीजण ट्रोलसुद्धा करत आहेत. अशातच विवियन डिसेनाच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकांना विवियन डिसेना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होणार असं वाटतं होतं. पण, तसं काही झालं नाही. त्यामुळेच सलमान खानने करणवीर मेहराला विजयी घोषित केल्यानंतर उपस्थित असलेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर रंग उडाले होते. फक्त चुम दरांग आणि शिल्पा शिरोडकर आनंदाने ओरडत उड्या मारत होत्या. सोशल मीडियावरदेखील विवियनचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे विवियनने एक्सवर पहिली पोस्ट शेअर करत चाहत्यांनी माफी मागितली आहे.

हेही वाचा – Video: शिवानी सोनारचा स्वतःच्याच हळदीत भन्नाट डान्स, अजय-अतुलच्या लोकप्रिय गाण्यावर अभिनेत्री थिरकली, पाहा व्हिडीओ

विवियन डिसेना एक्सवर पोस्ट करत म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि निःस्वार्थ प्रेम, पाठिंबा दिल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीमुळे नाराज केलं असेल तर मला माफ करा. मी तुमच्या सर्वांच्या भावना समजू शकतो की, तुम्हाला आता कसं वाटतं असेल. माझ्यावरील तुमचे प्रेम पाहून मी भावुक झालो आहे. तुम्हा सर्वांचा पाठिंबा पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी तुम्हाला वचन देतो की, मी कठोर परिश्रम करून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करेन.”

हेही वाचा – मराठी चित्रपट मागे पडण्यामागचं महेश मांजरेकरांनी सांगितलं ‘हे’ कारण, म्हणाले, “सिनेसृष्टीत सर्वच ‘अभिमन्यू’, पण…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सर्वाधिक मानधन घेणारा सदस्य विवियन डिसेना होता. हिंदी टेलिव्हिजनवरील विवियन हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’, ‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ आणि ‘सिर्फ तुम’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. विवियन डिसेनाची २० कोटी एवढी संपत्ती आहे.