Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता १३वा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सारा अरफीन खान घराबाहेर झाली. त्यामुळे आता घरात फक्त दहा सदस्य राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, अविनाश मिश्रा, रजत दलाल, ईशा सिंह, कशिश कपूर, चुम दरांग आणि श्रुतिका मिश्रा हे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे टॉप-१० सदस्य आहेत. आता यामधील सात सदस्यांवर या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार आहे. नुकताच हटके नॉमिनेशन टास्क पार पडला. यामध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

सध्या चुम दरांग ‘टाइम गॉड’ आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे चुमला नॉमिनेशन टास्कमध्ये विशेष अधिकार देण्यात आला होता. १३व्या आठवड्यात हटके नॉमिनेशन टास्क पार पडला. ज्यामध्ये काही सदस्यांनी न आवडत्या सदस्याला सुरक्षित केलं. या नॉमिनेशन टास्कमध्ये ‘हिफाजत कां स्तंभ’ होता. ज्यावर दोन सुरक्षित सदस्यांचे फोटो लावायचे होते. याची सुरुवात ‘टाइम गॉड’ चुम दरांगपासून झाली. त्यानंतर चुमने ज्या क्रमाने सदस्यांना बोलावलं, त्या सदस्याने ‘हिफाजत कां स्तंभ’वर असलेल्या दोन फोटोंपैकी एक फोटो काढून त्याला नॉमिनेट करायचं होतं आणि त्याच्या जागी दुसरा फोटो लावून संबंधित सदस्याला सुरक्षित करायचं होतं. यावेळी सदस्याला स्वतःचाच फोटो स्तंभावर लावण्याची मुभा नव्हती.

kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Prajakta Mali
“मी बॉस असणं खूप जणांना खुपलं”, प्राजक्ता माळी म्हणाली, “त्यांनी माझ्याकडे शेवटपर्यंत…”
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”
Bigg Boss 18 Digvijay Rathee is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार?
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट

हेही वाचा – Video: झूम बराबर झूम…; कौमुदीच्या संगीत सोहळ्यात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखचा पत्नीसह जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

सर्वात आधी चुमने ‘हिफाजत कां स्तंभ’वर विवियन डिसेना आणि रजत दलालचा फोटो लावला. कारण सर्वात शेवटी ज्या दोन सदस्यांचे फोटो स्तंभावर असतील ते दोन सदस्य सुरक्षित होणार होते. चुमला करणवीर मेहरा, श्रुतिका अर्जुन आणि शिल्पा शिरोडकर या तिघांपैकी दोघांना सुरक्षित ठेवायचं होतं. त्यामुळे तिने युक्ती लढवली आणि सर्वात आधी विवियन-रजतचा फोटो स्तंभावर लावला.

हेही वाचा – The Sabarmati Report OTT Release: आता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कुठे, कधीपासून जाणून घ्या…

त्यानंतर चाहत पांडेने विवियनचा फोटो काढून करणला सुरक्षित केलं. मग अविनाशने स्ट्रॅटर्जी केली. त्याने रजतचा फोटो काढून चक्क चाहतला सुरक्षित केलं. तसंच नंबर गेम खेळण्यासाठी विवियने चाहतचा फोटो काढून श्रुतिकाला या नॉमिनेशन टास्कमध्ये सुरक्षित केलं. तर रजतने करणचा फोटो काढून शिल्पाला सुरक्षित केलं. तसंच ईशाने श्रुतिकाचा फोटो काढून त्याजागी अविनाशचा फोटो लावला. नंतर कशिशने शिल्पाचा फोटो काढला आणि रजतला सुरक्षित केलं. कशिशनंतर श्रुतिका आली. तिने रजतचा फोटो काढून त्याच्याजागी करणचा फोटो लावला. मग शिल्पाने अविनाशचा फोटो काढून ईशाला सुरक्षित केलं. शेवटी करणने ईशाचा फोटो काढून शिल्पाचा फोटो लावला. ‘हिफाजत कां स्तंभ’वर अखेरीस करण आणि शिल्पाचा फोटो असल्यामुळे दोघं नॉमिनेशन टास्कमध्ये सुरक्षित झाले.

हेही वाचा – Video: नमक इश्क का…; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याच्या पत्नीचा बिपाशा बासूच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, १३व्या आठवड्यात अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, चाहत पांडे, कशिश कपूर, रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुन घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही आठवडे बाकी आहेत. त्याआधी या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader