लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व ‘बिग बॉस 18’मधील स्पर्धक विवियन डिसेनाची पहिली पत्नी वाहबिज दोराबजीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सात वर्षांनंतर अभिनयक्षेत्रात पुनरागमन करणाऱ्या वाहबिजचने अवघ्या एका महिन्यात मालिका सोडली आहे. ‘दीवानियात’ या मालिकेत ती बबीता चौधरीची भूमिका साकारत होती. वाहबिजने मालिका का सोडली, यासंदर्भात तिने स्वतःच माहिती दिली आहे.
एक महिन्यापूर्वी ऑन एअर झालेल्या ‘दीवानियत’ या मालिकेत वाहबिज दोराबजीची जागा आता अभिनेत्री तन्वी ठक्करने घेतली आहे. शो सोडण्याबद्दल प्रतिक्रिया देताना वाहबिज म्हणाली की, हा एक कठीण निर्णय होता. निर्माते आणि तिच्यादरम्यान कोणतेही मतभेद नाहीत.
हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
वाहबिजने मालिका का सोडली?
वाहबिज म्हणाली, “मला माझ्या तब्येतीच्या कारणांमुळे ही मालिका सोडावी लागला. मला मधुमेह आहे आणि मला संतुलित जीवनशैली जगावी लागते. या शोमुळे माझ्या प्रकृतीवर परिणाम होत होते. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकसाठी मला बराच वेळ शूटिंग करावे लागत होते. मी खूप उत्साहित होते, कारण मी या शोमधून सात वर्षांनी पुनरागमन केलं होतं, पण ठिक आहे, आयुष्य पुढे जात राहील.”
हेही वाचा – भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक
वाहबिजची मैत्रीण मालिकेत घेणार तिची जागा
आता या शोमध्ये वाहबिजच्या जागी तन्वी ठक्कर दिसणार आहे. तन्वी व वाहबिज खऱ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. “तन्वी माझी जागा घेत आहे याचा मला आनंद आहे”, असं वाहबिज म्हणाली. विशेष म्हणजे, तन्वीला याआधी वाहबिजच्या बहिणीच्या भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला होता, परंतु तिने मुलगा लहान असल्याने नकार दिला होता. मैत्रिणी असल्याने आम्ही त्यावर चर्चा केली आणि तिने मला हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, असं तन्वीने नमूद केलं.
हेही वाचा – प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
वाहबिज दोराबजी व अभिनेता विवियन डिसेना यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २०१३ मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या ८ वर्षांनंतर हे दोघंही अखेर वेगळे झाले आहेत. विवियन आणि वाहबिजनं त्यांच्या लग्नाच्या ३ वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघंही वेगळे राहत होते. मात्र घटस्फोटाची केस ४ वर्ष चालली त्यानंतर २०२१ मध्ये ते कायदेशीररित्या वेगळे झाले. त्यानंतर २०२२ मध्ये विवियनने परदेशी पत्रकार नौरन अलीशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगी आहे.