Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा जसजसा जवळ येत आहे, तशी सदस्यांमधली चुरस वाढत आहे. सध्या घरात नऊ सदस्य बाकी आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, रजत दलाल, अविनाश मिश्रा, श्रुतिका अर्जुन, चुम दरांग, चाहत पांडे आणि ईशा सिंह या नऊ सदस्यांमधून कोण-कोण अंतिम आठवड्यापर्यंत पोहोचतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. नुकताच ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क पार पडला. या टास्कमध्ये विवियन ज्या आक्रमकतेने खेळला हे प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडल्याचं दिसत आहे.

नुकताच ‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विवियन आणि चुम दुसरा ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क खेळताना दिसत आहेत. यावेळी टास्क जिंकण्यासाठी विवियन ज्या पद्धतीने खेळत आहे, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे प्रोमोवर नेटकरी प्रतिक्रिया देत विवियनच्या खेळाचं कौतुक करत आहेत.

Bigg Boss Marathi Fame Vikas Patil Celebrate Vishal Nikam birthday
Video: ही दोस्ती तुटायची नाय…; बऱ्याच दिवसांनी ‘बिग बॉस मराठी’ फेम विशाल निकम-विकास पाटीलची झाली भेट, पाहा व्हिडीओ
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Vivian Dsena on Ladla Tag
विवियन डिसेनाला ‘लाडला’ टॅग कसा मिळाला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा; म्हणाला, “कलर्स टीव्हीसाठी…”
CM Devendra Fadnavis Reaction on Ranveer Allahbadia Comment
रणवीर अलाहाबादियाच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “खूपच वाईट पद्धतीने…”
Bigg Boss Marathi fame Ankita prabhu Walawalkar share special post after visit akkalkot
“आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?” ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
celebrity masterchef nikki tamboli emotional breakdown after see brother photo
Video: ‘तो’ फोटो पाहताच निक्की तांबोळीच्या अश्रूंचा बांध फुटला, फराह खान समजावत म्हणाली, “तुझ्या मनात…”
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य

हेही वाचा – Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या १० दिवसांआधी झालं ‘मिड वीक एविक्शन’, कमी मतांमुळे ‘हा’ सदस्य घराबाहेर

दरम्यान, ८ जानेवारीच्या भागात ‘तिकीट टू फिनाले’चा पहिला टास्क पार पडला. यामध्ये विवियन आणि करणवीरने बाजी मारली. पण करणवीर चुमसाठी खेळत होता. त्यामुळे दुसऱ्या ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क विवियन विरुद्ध चुम झाला. या टास्कमध्ये एक स्ट्रेचर देण्यात आलं होतं. या स्ट्रेचरमध्ये गोल्डन आणि सिल्व्हर रंगाच्या छोट्या विटा जमा करायच्या होत्या. गोल्डन विटा विवियनच्या आणि सिल्व्हर विटा चुमच्या होत्या. त्यामुळे विवियन, चुमच्या समर्थकांना या विटा गोळा करून स्ट्रेचरमध्ये टाकायच्या होत्या. ते स्ट्रेचर एका बाजूला विवियन तर दुसऱ्या बाजूला चुमला पकडायचं होतं. स्ट्रेचरमध्ये ज्या रंगाच्या सर्वाधिक विटा असणार होत्या, तो सदस्य ‘तिकीट टू फिनाले’ जिंकणार होता.

‘तिकीट टू फिनाले’च्या दुसऱ्या टास्कमध्ये विवियन चुमला जिंकू न देण्यासाठी बऱ्याच गोष्टी करताना दिसला. कधी त्याने चुमच्या सिल्व्हर विटा कमी करण्यासाठी स्ट्रेचरला लाथ मारली. तसंच बळाचा वापर करून स्ट्रेचर उलट करताना दिसला. तर कधी त्याने थेट स्ट्रेचरमधील उलट करण्यासाठी चुमला फरफटतं नेलं. विवियनचा हा अवतार नेटकऱ्यांना फारच आवडला असून त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं; विवियन डिसेनासह ‘या’ सदस्याने ‘तिकीट टू फिनाले’ नाकारलं, नेमकं काय झालं? वाचा

“काहीही बोला विवियन बरोबर आहे”, “चुमने सुरुवात केली आणि विवियन चुकीचा ठरला…खरंच?”, “जनता विवियनच्या पाठिशी आहे”, “चुम दुखापत झाल्याचं नाटक करतेय”, “विवियन असाच खेळत राहा”, “विवियन आम्ही तुझ्या पाठिशी आहोत”, अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “विवियन असाच खंबीर राहा. आम्ही तुझ्याबरोबर आहोत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, विवियन बरोबर खेळत आहे. चुम स्वतः जमिनीवर झोपली होती. विवियने दुखापत होईल, असं सावधही केलं होतं. विवियन तू बरोबर आहेस.”

Comments
Comments

हेही वाचा – Bigg Boss 18: २१ लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने चाहत पांडेच्या बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा, फोटो शेअर करत म्हणाला…

Comments
Comments

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १४वा आठवडा सुरू आहे. रजत दलाल, चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन नॉमिनेट झाले आहेत. या सदस्यांमधून आता कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader