Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे १२ दिवसे बाकी राहिले आहेत. १९ जानेवारीला या पर्वाचा महाविजेता घोषित होणार आहे. वीकेंडच्या वारला सलमान खानने ‘बिग बॉस १८’च्या महाअंतिम सोहळ्याची तारीख जाहीर केली. या वीकेंडच्या वारला बरेच पाहुणे ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळाले. अभिनेत्री काम्या पंजाबी खास विवियन डिसेनासाठी आली होती. तिने यावेळी विवियनला खूप सुनावलं. तसंच सलमान खानने देखील त्याची कानउघडणी केली. पण आता यावरून विवियनने नाराजी व्यक्त केली आहे.
६ जानेवारीच्या भागात विवियन डिसेना वीकेंडच्या वारला जे झालं त्यावरून अविनाश आणि ईशासमोर नाराजी व्यक्त करताना दिसला. तो म्हणाला, “मला याचं वाईट वाटलं, जेव्हा सलमान सरांनी दोन ओळीत माझ्या आयुष्यात जे काही झालं, त्याचं वर्णन केलं. ज्या पद्धतीने ते बोलले त्यामुळे मी दुखावलो. तू आयुष्यात काय पाहिलं आहेस? तू बोलतो हे पाहिलं ते पाहिलं. त्यानंतर त्या गोष्टीची तुलना करणवीर मेहराबरोबर करणं. त्याच्या आयुष्यात दोन वेळा लग्न घटस्फोट झालेत वगैरे. तर तो त्याचा प्रवास आहे ना. त्याचा हा प्रवास त्याला खडतर वाटला. मला माझा प्रवास खडतर वाटला.”
हेही वाचा – Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
पुढे काम्या पंजाबीबाबत विवियन म्हणाला, “मी तिच्याबरोबर काम केलंय. पण मी काही वर्षे तिच्यापासून दूर आहे. लोकांना काय वाटतं याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. काम्या म्हणतं होती, मी या विवियनला ओळखत नाही. हॅलो, ती एक फेज होती. त्यावेळेस मी खूप बंडखोर होतो. तेव्हा मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. कॉन्ट्रॅक्ट फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचो. माझा हा फॉरमॅट आहे. असं करायचं असेल तरच मी करणार शो. नाहीतर अजिबात सही करणार नाही. निघ, असं म्हणायचो.”
“मी एका माणसातून दुसऱ्या माणसात प्रवास केल्यानंतर मी जे काही झालोय आणि इथे आहे. यांचं मतं आहे, आम्हाला जुना विवियन पाहिजे. तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा. त्याच्याकडून करून घ्या. मी माझा स्वभाव बदलणार नाही,” असं स्पष्ट विवियन डिसेना म्हणाला.
हेही वाचा – Bigg Boss 18: करणवीर मेहराने रिलेशनशिपवरून चाहत पांडेला डिवचलं, अभिनेत्रीने रागाच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
हेही वाचा – Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १४वा आठवडा सुरू आहे. आता घरात नऊ सदस्य राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, चाहत पांडे आणि रजत दलाल या नऊ जणांपैकी कोण अंतिम फेरीपर्यंत पोहोचतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.