Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या ११वा आठवडा सुरू आहे. दिवसेंदिवस हे पर्व आणखी रंगदार होतं आहे. नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. हा नॉमिनेशन टास्क थोडा हटके आणि आश्चर्यचकीत करणारा होता. एकूण आठ सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. १६ डिसेंबरच्या नॉमिनेशन टास्कमध्ये नेमकं काय घडलं? कोणते आठ सदस्य नॉमिनेट झाले? जाणून घ्या…
नेहमीप्रमाणे नॉमिनेशन टास्कमध्ये महत्त्वाचे निर्णय ‘टाइम गॉड’च्या हातात होते. अविनाश मिश्रा सध्या ‘टाइम गॉड’ आहे. त्यामुळे अविनाशला एकूण तीन सदस्यांकडून नॉमिनेट करण्याचा अधिकार हिसकावून घ्यायचा होता. अविनाशने दिग्विजय सिंह राठी, कशिश कपूर, चाहत पांडे यांना इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला नाही. यावेळी विवियन डिसेना पूर्णपणे बदललेला पाहायला मिळाला.
हेही वाचा – ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याची आईच्या उपचारासाठी मदतीची हाक, म्हणाला, “गेले तीन महिने…”
काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात विवियन डिसेनाची बायको आली होती. तेव्हा तिने विवियनला स्वतःसाठी खेळण्याचा सल्ला दिला. तसंच करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर हे खरे मित्र नसल्याचं तिने सांगितलं. तेव्हापासून विवियनने खेळण्याची स्ट्रॅटजी बदलली आहे. त्याने नॉमिनेशन टास्कमध्ये करणवीर मेहरा आणि शिल्पा शिरोडकरला नॉमिनेट केलं.
त्यानंतर नॉमिनेशन टास्कमध्ये एक हटके प्रक्रिया पाहायला मिळाली. अविनाश कॅफेमध्ये जाऊन घरातील सर्व मुलींना अविनाशला इम्प्रेस करायचं होतं. त्यानंतर अविनाश इम्प्रेस झाल्यानंतर कॉफी देणार होता, ती कॉफी मुलींना नॉमिनेट करत असलेल्या सदस्यांना द्यायची होती. यावेळी अविनाशने कशिश कपूर आणि चाहत पांडेला कॉफी दिली नाही. म्हणजेच त्यांना इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला आहे.
हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकारांची ग्रेट भेट; निमित्त आहे खूपच खास
११व्या आठवड्यात एकूण आठ सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार आहे. यामिनी मल्होत्रा, रजत दलाल, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, दिग्विजय सिंह राठी, चुम दरांग आणि श्रुतिका अर्जुन या सदस्यांपैकी आता कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.