Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात विवियन डिसेना दुसरा ‘टाइम गॉड’ झाला आहे. या पर्वात घराच्या कॅप्टनला ‘टाइम गॉड’ म्हटलं जात आहे. ३० ऑक्टोबरच्या भागात ‘टाइम गॉड’ बनण्यासाठी एक टास्क देण्यात आला होता. ज्यामध्ये सदस्यांना एकमेकांच्या विरोधात बोलायचं होतं. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना या दोघांमध्ये हा टास्क रंगला. यावेळी दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. करणने विवियन स्वतःची ड्युटी कशी उशीरा करतो, याबद्दल सांगितलं. तसंच विवियनने देखील करणबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. अखेर सर्व सदस्यांच्या सहमतीने विवियन डिसेना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील दुसरा ‘टाइम गॉड’ झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाइम गॉड’ होताच विवियन डिसेनाकडे अनेक अधिकार आले आहेत. आता विवियनला एक अग्निपरीक्षा ‘बिग बॉस’ने दिली आहे. ती म्हणजे दोन सदस्यांना जेलमध्ये पाठवायचं आहे. यावेळी विवियने घरातील सदस्यांचं मत जाणून घेतलं आहे. याचा प्रोमो ‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘टाइम गॉड’ होताच विवियन डिसेनाचं बदललं रुप, श्रुतिका अर्जुनशी झाले वाद

या प्रोमोमध्ये रजत म्हणतो की, जेलमध्ये असा एक सदस्य पाहिजे. जो कोणत्याही परिस्थितीत त्याने रेशन दिलं पाहिजे. त्यानंतर ईशा सिंह म्हणते की, माझे दोन नावं चाहत आणि रजत दलाल आहे. हे दोघं खूप न्यूट्रल आहेत. कोणत्या बाजूने खेळतायत हे कळतं नाहीये. पुढे शिल्पा शिरोडकर करण आणि रजतचं नाव जेलमध्ये पाठवण्यासाठी घेते. करण म्हणतो की, चाहतला जेलमध्ये पाठवा. घराच्यांचं मत ऐकून घेतल्यानंतर विवियनने सारा अरफीन खान आणि तजिंदर बग्गा यांच्या जागी दोन सदस्यांना जेलमध्ये पाठवलं आहे.

हेही वाचा – “फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”

विवियनने सारा आणि तजिंदर यांच्या जागी रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुनला जेलमध्ये पाठवलं आहे. त्यामुळे आता आठवडाभर रेशन वाटपाचा अधिकार रजत दलाल आणि श्रुतिकाकडे असणार आहे. याबाबत ‘बिग बॉस खबरी’ या पेजवर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणच्या घरी पोहोचला अभिजीत सावंत, पत्नी शिल्पा सावंत फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या चौथ्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक, श्रुतिका अर्जुन, अरफीन खान, शिल्पा शिरोडकर आणि शहजादा या सदस्यांना बहुमताने नॉमिनेट केलं आहे. आता या सदस्यांपैकी कोण घराबाहेर होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 vivian dsena sent to rajat dalal and shrutika arjun in jail pps