Vivian Dsena in Bigg Boss 18: बिग बॉस १८ हा शो दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. या शोमधील काही स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेला अभिनेता विवियन डिसेना यंदाच्या पर्वात सहभागी झाला आहे. आता विवियनने शिल्पा शिरोडकरशी बोलताना त्याचा घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं.

ताज्या एपिसोडमध्ये शिल्पा शिरोडकर व विवियन डिसेना बसून बोलत असतात. तेव्हा शिल्पा विवियनला त्याची पत्नी नूरन अलीबद्दल विचारते. दोघांची भेट कशी झाली असं शिल्पाने विचारल्यावर विवियन म्हणाला, “तिने माझ्या मुलाखतीसाठी माझ्या टीमशी संपर्क केला होता आणि मी तिला चार महिने वाट पाहायला लावली. त्यानंतर तिने मला थेट मेसेज केला आणि मला अनप्रोफेशनल म्हटलं.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

हेही वाचा – Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

शिल्पाने विवियनला पहिल्या घटस्फोटाबाबत विचारलं. विवियनने २०१३ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्न केलं होतं. २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. शिल्पाने विवियनला विचारलं की त्याचं पहिलं लग्न किती काळ टिकलं? त्यावर विवियन म्हणाला, “मला माहीत नाही, पण कदाचित तोपर्यंत जेव्हापर्यंत ती मला सहन करू शकत होती आणि समजू शकत होती की मी कोण आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंची अचानक शोमधून एक्झिट! नेमकं काय घडलं? ते बिग बॉसच्या घरात परतणार का? वाचा

विवियन व नूरन यांची पहिली भेट इजिप्तमध्ये एका इव्हेंटमध्ये झाली. तिथे हे दोघे भेटले आणि त्यांच्यात जवळीक वाढली. “तिथेच सगळं सुरू झालं. ती खूप चांगली आहे. ती माझ्या आयुष्यात आहे, याचा मला आनंद आहे,” असं विवियन म्हणाला. तसेच मागच्या काही वर्षात आपल्या स्वभावात खूप बदल झाल्याचं विवियनने सांगितलं. हे बदल एका रात्रीत झाले नाही, मात्र ती मुलगी (नूरन अली) खूप सॉलिड आहे, असं विवियनने नमूद केलं.

हेही वाचा – या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं? वाचा चित्रपट अन् वेब सीरिजची यादी

विवियन डिसेनाने स्वीकारला इस्लाम धर्म

ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या विवियनने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. २०१९ पासून आपण इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचं विवियनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “माझ्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आणि आता मी इस्लामचे पालन करतो. २०१९ सालातील रमजान महिन्यापासून मी इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली. दिवसातून ५ वेळा प्रार्थना केल्याने मला खूप चांगलं वाटतं,” असं विवियन डिसेना एका मुलाखतीत म्हणाला होता.

Story img Loader