Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरुवातीपासून रंगदार सुरू आहे. पहिल्या दिवसापासून या पर्वात फुल्ल ड्रामा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चार दिवसांत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून ते ‘बिग बॉस’ला जबरदस्त कंटेंट देत असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. अवघ्या चार दिवसांत त्यांनी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. १० ऑक्टोबरच्या संपूर्ण भागात गुणरत्न सदावर्ते यांनी मनोरंजन केल्याचं म्हटलं जात आहे. या भागात सदावर्तेंना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता? पण नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरू झाल्यापासून तजिंदर पाल सिंह बग्गा आणि हेमा शर्मा हे दोघं चाहत पांडेच्या जागी जेलमध्ये आहेत. चाहत ही ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील पहिली सदस्य आहे. त्यामुळे तिला तिच्या जागी इतर दोन सदस्यांना जेलमध्ये जाण्याकरिता मनधरणी करायची होती. यावेळी तजिंदर बग्गा आणि हेमा शर्मा यांनी स्वतःहून होकार दिला. पण आता दोघांना देखील त्यांच्या या निर्णयाचा पश्चाताप होताना दिसत आहे. अशातच तजिंदर आणि गुणरत्न यांची चांगलीच मैत्री झाली आहे. त्यामुळे सदावर्ते सतत तजिंदर, हेमाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी आवाज उठवताना दिसत आहेत. १० ऑक्टोबरच्या भागात ‘बिग बॉस’ने एक ट्विस्ट आणला.

हेही वाचा – Video : “आपली पायरी…”, धनंजय पोवार पुन्हा परतला कामावर, बऱ्याच दिवसांनी मालकाला पाहिल्यानंतर कर्मचारी म्हणाले…

‘बिग बॉस’ने सर्व सदस्यांना सांगितलं की घरातील जेल कधीच रिकामी राहणार नाही. त्यामुळे तजिंदर आणि हेमाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी हात वर करा. पण यावेळी सदस्यांचं एकमत होतं नव्हतं. कारण सदस्यांना तजिंदर आणि हेमा दोघांची देखील जेलमधून सुटका व्हावी, अशी इच्छा होती. मात्र, तसं झालंच नाही. त्यामुळे ‘बिग बॉस’ने आणखी एक पर्याय दिला. तजिंदर आणि हेमा ऐवजी घरात असलेल्या इतर दोन सदस्यांना जेलमध्ये पाठवण्याचा पर्याय ‘बिग बॉस’ने दिला. यावेळी चाहत स्वतःहून जेलमध्ये जायला तयार झाली. पण दुसरा सदस्य कोण? हे काही ठरत नव्हतं. अखेर ‘बिग बॉस’ने या प्रक्रियेदरम्यान जे सदस्य मतावर ठाम होते, त्यांना जेलमध्ये जाणारा दुसरा सदस्य निवडण्याचा विशेष अधिकार दिला. अविनाश मिश्रा, करण मेहरा आणि ईशा सिंह यांना हा विशेष अधिकार दिला गेला.

अविनाश, करण आणि ईशाने एकमताने जेलमध्ये जाणारा दुसरा सदस्य गुणरत्न सदावर्ते असल्याचं जाहीर केलं. पण सदावर्तेंना हा निर्णय अजिबात मान्य नव्हता. त्यांनी घरात एकच गोंधळ घातला. बऱ्याच सदस्यांनी गुणरत्न सदावर्तेंना जेलमध्ये जाण्यासाठी मनधरणी केली. पण “माझ्या प्रतिमेला गालबोट लागू देणार नाही”, “मला सरकार घाबरत”, “मला दाउद इब्राहिम घाबरतो”, अशी अनेक विधान करत सदावर्ते शेवटपर्यंत जेलमध्ये जाणार नसल्याच्या मतावर ठाम राहिले. एवढंच नव्हे तर ते ‘बिग बॉस’च्या विरोधातही बोलले. अखेर अविनाश, करण आणि ईशाचा निर्णय फोल ठरला. चाहत आणि गुणरत्न सदावर्ते जेलमध्ये गेलेच नाहीत.

हेही वाचा – Video: जया बच्चन यांनी काजोलला घट्ट मिठी मारून केलं गालावर किस, नेटकरी म्हणाले, “दोघी सारख्या…”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकला नसला तरी रितेश देशमुखने अभिजीत सावंतला दिली खास ट्रॉफी, गायक म्हणाला, “भाऊंनी…”

दरम्यान, गुणरत्न सदावर्तेंनी जेलमध्ये न जाण्यासाठी जे काही केलं, त्याचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. घरातील सदस्य अविनाश मिश्राने देखील सदावर्तेंचं कौतुक केलं. पण, येणाऱ्या पहिल्याच वीकेंडच्या वारला सलमान खान काय करतोय? याकडे आता सगळ्यांचं अधिक लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 what did gunaratna sadavarte do not to go to the jail pps