Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले होते. पण अचानक गुणरत्न सदावर्तेंना घराबाहेर काढण्यात आलं. १५ ऑक्टोबरच्या भागात ‘बिग बॉस’ने गुणरत्न सदावर्तेंना कन्फेशन रुममध्ये बोलवून काही वेळासाठी घराबाहेर जाण्यास सांगितलं. कारण न्यायालयात सदावर्तेसंबंधित काही खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढणं आवश्यक होतं. पण, गुणरत्न सदावर्ते हे हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील सर्वाधिक एंटरटेनर सदस्य होते. प्रेक्षकांसह सलमान खानने देखील त्यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते घराबाहेर झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच गुणरत्न सदावर्तेंचा ‘बिग बॉस १८’मध्ये जाण्यामागचा नेमका हेतू काय होता? याचा खुलासा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच गुणरत्न सदावर्तेंसह त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना सुरुवातीलाच विचारण्यात आलं की, “बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला?” ते म्हणाले, “पहिलं असं आहे की, राजकारण्यांची, कलाकारांचीसुद्धा राजकीय लफडी असतात. मी म्हटलं कला क्षेत्रात जाऊन तिथे काय लफडी आहेत, ते बघितलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं तपासण्यासाठी आणि व्यवसायाने दाताचा डॉक्टर असल्यामुळे ती चिकित्सा करून घ्यावी, असं वाटलं. तसंच कुठेतरी एक वेगळं सादरीकरण करण्याची निर्सगाला इच्छा झालेली असेल, म्हणून ‘बिग बॉस’मध्ये जावं वाटलं. कारण तिथे आपली स्पष्ट मतं ठेवता येतील. पण, मी खरोखर माझ्या कामात खूप व्यग्र होतो. माझ्याकडे वेळ फार कमी होता.”

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस १८’मधून बाहेर काढण्याचं नेमकं कारण काय? स्वतः सांगत म्हणाले…

u

u

‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री करण्यापूर्वी शेवटच्या क्षणी सदावर्तेंना मुलगी म्हणाली…

पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “मी प्रथमचं हे सांगतो, ज्या दिवशी ‘बिग बॉस’मध्ये जायचं होतं. त्यादिवशी सलमान खान येणार होता. तेव्हा मी परळच्या ऑफिसमध्ये चार वाजेपर्यंत एकसारखं काम करत होतो. तोपर्यंत ‘बिग बॉस’मध्ये जाणं निश्चित नव्हतं. कलर्सच्या टीममधील माणसं खूप चांगली आहेत. मी माझं सगळं काम करून मी साडेसहा वाजता ‘बिग बॉस’च्या सेटवर पोहोचलो. तेव्हा एकाबाजूला पत्नी जयश्री पाटील होत्या आणि दुसऱ्याबाजूला माझी मुलगी होती. मुलगीला विचारलं, जमले का? जाऊ का? तेवढ्यात तिचं दुसरं मत होतं. इथे जाऊन काय करणार आहात? पण, इतर सगळे केविलवाणे चेहरे आणि त्यांची माझ्याबद्दलची आस्था हे पाहून मला असं वाटलं गेलं पाहिजे. त्यानंतर मी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंचा ‘बिग बॉस १८’मध्ये जाण्यामागचा होता ‘हा’ हेतू; म्हणाले, “कलाकारांची राजकीय लफडी…”

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यानंतर ‘बिग बॉस १८’मधून हेमा शर्मा बेघर झाली. सध्या तिसरा आठवडा सुरू असून या आठवड्यात अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, रजत दलाला, मुस्कान बामने आणि नायरा बनर्जी यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे या पाच सदस्यांमधून कोण एलिमिनेट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 why did gunaratna sadavarte decide to enter salman khan show pps