Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दिवाळीच्या मुहूर्तावर दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. ‘स्प्लिट्सविला’च्या १५व्या पर्वात झळकलेले दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाले आहेत. पण हे दोन वाइल्ड कार्ड सदस्य येताच ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूरने विवियन डिसेनासह चार जणांच्या ग्रुपला टार्गेट केलं आहे. दिग्विजयने येताच विवियन टोला लगावला. “काही लोक ‘बिग बॉस’चे लाडके होण्यासाठी आले आहेत तर मी जनतेचा लाडका बनायला आलो आहे”, असं म्हणत दिग्विजयने विवियनला सुनावलं. तसंच कशिशने देखील अविनाशबद्दल भाष्य केलं. तो अजिबात आवडत नसल्याचं, कशिश म्हणाली.
त्यानंतर दिग्विजय आणि कशिश ‘बिग बॉस’च्या घरात गेले. घरात जाताच कशिशचं आणि ईशा सिंहबरोबर वाजलं. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. ईशा कशिशला म्हणते की, तुला माझ्यामुळे असुरक्षित वाटतंय? कशिश म्हणाली, “तुझ्यामुळे?…तुझ्यात आहे तरी काय? की मला असुरक्षित वाटेल.” अशाप्रकारे दोघींमध्ये वाद पाहायला मिळत आहेत.
दिग्विजय आणि कशिशमधील वाद
दरम्यान, ‘स्प्लिट्सविला १५’मध्ये शेवटच्या काही भागांमध्ये दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूरची जोडी बनली होती. पॉवर कपल म्हणून दोघांना ओळखलं जातं होतं. दोघं ‘स्प्लिट्सविला १५’च्या फिनालेपर्यंत पोहोचले होते. पण जिंकण्याची संधी कशिशमुळे हुकली. ‘स्प्लिट्सविला १५’च्या फिनालेपर्यंत गेलेल्या तीन कपलला फिनाले आणि पैसे या दोनमधील एक पर्याय निवडायचा होता. दिग्विजय आणि कशिशला व्यक्तिरिक्त असलेल्या दोन्ही कपलने फिनाले पर्याय निवडला होता. पण कशिशने एकटीनेच पैसे हा पर्याय निवडला. त्यामुळे दिग्विजयचं ‘स्प्लिट्सविला १५’ जिंकण्याचं स्वप्न भंग झालं. तेव्हापासून दोघांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd