Karan Veer Mehra Bigg Boss 18 Winner : लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या १८ व्या पर्वाला अखेर विजेता मिळाला आहे. १५ आठवड्यांच्या प्रवासानंतर विवियन डिसेनाला हरवत अभिनेता करणवीर मेहरा विजेता ठरला. करणवीरने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा व ईशा सिंह हे बिग बॉस १८ चे टॉप सहा सदस्य होते. या सहापैकी सर्वात आधी ईशा सिंह विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाली. त्यानंतर चुम दरांग व अविनाश मिश्रा बिग बॉसच्या घराबाहेर पडले. तिसऱ्या क्रमांकावर रजत दलाल बाद झाला, त्यानंतर विवियन डिसेना व करणवीर मेहरा हे टॉप २ सदस्य होते. अखेर करणवीर विजेता असल्याची घोषणा होस्ट सलमान खानने केली.

हेही वाचा – BB18 Winner : दोन घटस्फोट, इंडस्ट्रीत १९ वर्षे काम, एकेकाळी दारुचं जडलेलं व्यसन अन्…; करणवीर मेहराबद्दल जाणून घ्या सर्वकाही….

बिग बॉस १८ जिंकल्यानंतर करणनवीरने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे. त्याने बिग बॉसच्या ट्रॉफीसह आई व बहिणीबरोबर फोटो शेअर केले आहेत.

आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आला आहे! जनतेच्या लाडक्याने हा द करणवीर मेहरा म्हणजे बिग बॉस 18 हा शो जिंकला आहे.

बिग बॉस 18 का खरा हिरो त्याने दिलेल्या वचनानुसार ट्रॉफी घेऊन परतला आहे. तटस्थ प्रेक्षकांची खरी ताकद तुम्ही सर्वांनी दाखवून दिली आहे. #KVMNation आणि #KaranKeVeeron, हा विजय तुमचा आहे.

दुसरी ट्रॉफी देखील आता घरी आली आहे आणि ती खूप चमकत आहे! असं करणवीरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

करणवीर मेहराने कलर्सचा हा दुसरा रिअॅलिटी शो जिंकला आहे. तो ‘खतरों के खिलाड़ी 14’ चा विजेता होता. त्यानंतर तो बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. १५ आठवडे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर तो सर्व स्पर्धकांना मागे टाकत या शोचा विजेता ठरला. करण व चुम या दोघांचं नातं, करणची शिल्पा शिरोडकरबरोबरची मैत्री या गोष्टींची या पर्वात खूप चर्चा झाली. बिग बॉस जिंकल्यानंतर करणवीरला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

सलमान खानची १ तास वाट पाहिली, शेवटी शूटिंग न करताच परतला स्टार अभिनेता…; Bigg Boss 18 च्या सेटवर काय घडलं?

‘बिग बॉस 18’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर, करणवीर मेहराने मीडियाशी संवाद साधला. त्याने पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला, “मी खूप खूश आहे, खूप जास्त, तुमचा खूप पाठिंबा होता. चाहत्यांनी दिलेला पाठिंबा, त्यांनी दिलेली मतं आणि घरातील माझी काही चांगली नाही, यामुळेच मी जिंकू शकलो.”