Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व चांगलंच गाजलं. हे पर्व १०० नव्हे १०५ दिवसांचं होतं. ६ ऑक्टोबर २०२४पासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा प्रवास १९ जानेवारी २०२५ला संपला. ‘बिग बॉस’चं हे पर्व संपून महिना झाला. पण, या पर्वातील स्पर्धक नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अरफीन खान, सारा खान, ऍलेस कौशिक, नायरा बॅनर्जी आणि तजिंदर सिंग बग्गा गोव्याच्या किनाऱ्यावर पाहायला मिळाले. अशातच दुसऱ्याबाजूला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहराने एक मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच करणवीर मेहरा भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये उपस्थित राहिला होता. यावेळी करणने ‘बिग बॉस’संबंधित काही खुलासे केले. करण म्हणाला, “‘खतरों के खिलाडी १४’ हा माझा ‘कलर्स’ वाहिनीबरोबरचा पहिला कार्यक्रम होता. आता माझा हे चॅनेल सोडण्याचा काहीही विचार नाहीये. ‘कलर्स’ तुम्हाला नवीन ओळख देतं. ‘बिग बॉस १८’मध्ये मी ५० लाख रुपये जिंकलो. पण अजूनही बक्षीसाची रक्कम येणं बाकी आहे.”

पुढे करणवीर मेहरा म्हणाला की, ‘खतरों के खिलाडी १४’ची बक्षीसाची रक्कम आली आहे आणि गाडीदेखील दिली आहे. अलीकडेच करणचा पांढऱ्या रंगाच्या आलिशान गाडीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हीच गाडी ‘खतरों के खिलाडी १४’कडून करणला मिळाली आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात सहा सदस्य पोहोचले होते. यामधून सर्वात आधी ईशा सिंह एविक्ट झाली. त्यानंतर चुम दरांग, अविनाश मिश्रा घराबाहेर झाला. या दोघांनंतर रजत दलाल एलिमिनेट झाला. हे एलिमिनेशन जाहीर करताना सलमान खानला आश्चर्याचा धक्का बसला होता. अखेर करणवीर मेहरा, विवियन डिसेना या दोघांत चुरस पाहायला मिळाली आणि करण ‘बिग बॉस १८’चा महाविजेता ठरला.

करणवीर मेहराच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याने २००४मध्ये ‘रिमिक्स’च्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर करणने ‘बीवी औ में’, ‘रागिणी एमएमएस २’, ‘मेरे डॅड की मारुती’ आणि ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ यामध्ये पाहायला मिळाला. माहितीनुसार, करणवीर मेहराकडे जवळपास १२ कोटींची संपत्ती आहे. तसंच दिल्लीत त्याचं एक आलिशान घर झालं.