Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ट्रॉफी अभिनेता करणवीर मेहराने जिंकली. २२ सदस्यांना हरवून करणने या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं. पण, करण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता झाल्यामुळे अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. व्होटिंगमध्ये घोळ असल्याचा आरोप लावत आहेत. महाअंतिम सोहळ्याला सलमान खानने करणवीर मेहराचं नाव विजेता म्हणून जाहीर केल्यानंतर रजत दलालचा चेहरा पडला होता. यावर करणने आता प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा १९ जानेवारीला पार पडला. या सोहळ्याला या पर्वात सहभागी झालेले सर्व सदस्य उपस्थित राहिले होते. फक्त गुणरत्न सदावर्ते आणि दिग्विजय सिंह राठी गैरहजर होते. यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांमध्ये काही जणांना विवियन डिसेना तर काही जणांना रजत दलाल विजेता व्हावा, असं वाटतं होतं. पण तसं काही झालं नाही. सलमान खानने करणवीर मेहराचं नाव विजेता म्हणून घोषित करताच चुम दरांग आणि शिल्पा शिरोडकरला खूप आनंद झाला. दोघी एकमेकींना मिठी मारून उड्या मारून लागल्या. पण, इतर सदस्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडलेला पाहायला मिळाला. यावेळी रजत दलालने टाळ्यासुद्धा वाजल्या नाहीत. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नुकताच करणवीर मेहरा एका ठिकाणी स्पॉट झाला. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी करण शाहरुख खानची पोज करताना दिसला. त्यानंतर पापाराझींनी त्याच्याशी संवाद साधला. करणला विचारलं की, ‘लाफ्टर शेफ’मध्ये दिसणार आहेस का? यावर अभिनेता म्हणाला, “नक्कीच दिसू शकतो. ते कधी विचारतायत, याचीच वाट बघतोय.” त्यानंतर रजत दलालचं नाव न घेता विचारलं की, तू जिंकल्यानंतर काहीजण आनंदी नव्हते. त्यावर करण म्हणाला की, “जलने दो, जलने वाले को.”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहरा ठरला असला तरी दुसऱ्या बाजूला फर्स्ट रनर-अप विवियन डिसेना खूप प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. नुकतीच विवियन आणि त्याची पत्नी नूरन अलीने सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या सक्सेस पार्टीला करण, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन, रजत दलाल, दिग्विजय सिंह राठी व्यतिरिक्त ‘बिग बॉस’मध्ये झळकलेले सर्व सदस्य पाहायला मिळाले. विवियनच्या सक्सेस पार्टीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 winner karan veer mehra talk about on rajat dalal viral reaction after bigg boss 18 winner announcement pps