Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहराची तुलना सध्या सिद्धार्थ शुक्लाशी केली जात आहे. याआधी फराह खानने करणची तुलना सिद्धार्थशी केली होती. सतत करणला टार्गेट केलं जात असल्यामुळे एका वीकेंड वारला फराह खान म्हणाली होती, “हा करणवीर मेहरा शो झाला आहे. याआधी मी असं काहीस पाहिलं होतं. अशाच प्रकारे एका सदस्याला टार्गेट केलं जात होतं तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि तो शो जिंकला.” फराह खानचं हे वक्तव्य खरं ठरलं. सतत टार्गेटवर असणारा करणवीर मेहरा ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस’चं १३वं पर्व जिंकण्याआधी ‘खतरों के खिलाडी’च्या सातव्या पर्वाची ट्रॉफीवर त्याने नाव कोरलं होतं. तसंच करणनेदेखील ‘बिग बॉस’चं १८वं जिंकण्याअगोदर ‘खतरों के खिलाडा’च्या १४व्या पर्वाची ट्रॉफी जिंकली होती. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर सिद्धार्थने आई आणि बहिणीबरोबर फोटो काढला होता. तसंच करणनेसुद्धा ‘बिग बॉस’चं १८वं पर्व जिंकल्यानंतर आई आणि बहिणीबरोबर सर्वातआधी फोटो काढला. या सर्वकाही योगायोगामुळे सध्या करणची सिद्धार्थ शुक्लाशी तुलना केली जात आहे. यावरून करण काय म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा – Bigg Boss 18: “अखेर खरा निकाल लागला…”, करणवीर मेहरा विजयी होताच लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट, दोघांनी एकत्र केलं होतं काम

सर्व माध्यमांशी संवाद साधताना करणवीर मेहराला विचारलं की, तुझी सिद्धार्थ शुक्लाशी तुलना केली जात आहे. तर काय सांगशील? यावर करण म्हणाला, “तो खूप चांगला मुलगा होता. माझा तो खूप चांगला मित्र होता. आम्ही एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवला नाही. पण आम्ही एकमेकांना चांगलं ओळखत होतो. माझी सिद्धार्थशी तुलना केली जात आहे, याचा मला आनंद आहे. तो मनाने खूप मोठा माणूस होता. मी जेव्हा मुंबईत नवीन आलो होतो. तेव्हा त्याच्याकडे खूप मोठी बाईक होती. तर मी त्याला एक विनंती केली की, मला काही फोटो काढायचे आहेत. तर मी तुझ्या बाईकच्या बाजूला उभा राहून फोटो काढू का? त्यावेळी तो खाली आहे. मला बाईकची चावी दिली आणि म्हणाला, रस्त्यावर चालवतानाचे फोटो काढ. एवढी महागडी बाईक त्याने मला लगेच दिली. याचा अर्थ तो किती मोठ्या मनाचा माणूस होता कळू शकतं.”

हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानने करणवीर मेहराचं नाव घेताच चुम, शिल्पा झाला आनंद; बाकी सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता व्यवसाय क्षेत्रात करणार पदार्पण, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

करणवीर मेहराच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याने २००४मध्ये ‘रिमिक्स’च्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर करणने ‘बीवी औ में’, ‘रागिणी एमएमएस २’, ‘मेरे डॅड की मारुती’ आणि ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ यामध्ये पाहायला मिळाला. माहितीनुसार, करणवीर मेहराकडे जवळपास १२ कोटींची संपत्ती आहे. तसंच दिल्लीत त्याचं एक आलिशान घर झालं.