‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शोच्या पहिल्या भागापासूनच चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाची एक वेगळीच बाजू या शोमध्ये पाहायला मिळत आहे. स्पर्धक विकास सावंतबरोबरचा तिचा कॅप्टन्सी टास्कदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यावेळी विकास-अपूर्वामध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. पण आता काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

मराठी कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर केला होता. यामध्ये घरातील दोन्ही टीम कॅप्टनसीसाठी खेळताना दिसली. विकास आपल्या टीमसाठी अगदी जीव तोडून खेळला. विकासचं टी-शर्ट खेचणं, त्याला ढकलणं, खाली पाडणं, अंगावर बसणं अशा कित्येक युक्त्या अपूर्वा या टास्करदरम्यान करताना दिसली. या दोघांमधला हा राडा प्रंचड गाजला.

आता विकास व अपूर्वा एकत्र बसून गप्पा मारताना दिसत आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये अपूर्वा व विकास एकत्र बसलेले दिसत आहेत. ती विकासकडे किरण मानेंची तक्रार करत म्हणते, “तुझा दादा म्हणतो परिस्थिती बघून बदलते ही बाई. मी परिस्थिती बदलून काही बदलत नाही. मला काही पडलेली पण नाही. या घरात असे किती लोक आहे ज्यांना फक्त मी टास्कमध्ये बोलते. विकास तू मोठा गेमर आहेस.” यावेळी विकास तिला म्हणतो, “तुला माहित आहे का, मी हे आधी कुठे बोललो नाही पण घरी चपाती खात खात मी तुला टीव्हीवर बघायचो.” विकासचं हे बोलणं ऐकून अपूर्वा हसते.

आणखी वाचा – “…म्हणून मी तुमची आई होत नाही”; माजी पॉर्नस्टार मिया खलिफा संतापली

पुढे ती म्हणते, “मी तुला खरं सांगू या घरात कोणीच माझ्याशी बोललं नाही तर मला फरक नाही पडत. पण जेव्हा तू माझ्याशी अबोला धरशील किंवा अक्षय अबोला धरेल तेव्हा मला खूप वाईट वाटेल.” या व्हिडीओनंतर प्रेक्षक अपूर्वालाच ट्रोल करत आहेत. शिवाय अपूर्वा व विकासमध्ये आता मैत्री होत असल्याचं या व्हिडीओद्वारे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 4 marathi apurva nemlekar and vikas sawant together after fight watch video kmd