रिॲलिटी शो ‘बिग बॉस ८’ मधून अभिनेत्री रेनी ध्यानी हिला खूप लोकप्रियता मिळाली. ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच रेनीचं लग्न झालं आणि तिने लग्नाचा आनंद सर्वांबरोबर शेअर करण्यासाठी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. पण नंतर असं काही घडलं की अभिनेत्री अस्वस्थ झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिने लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले.
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावरून शेअर करतात. काही जण कमेंट्स ऑफ करतात, तर काही जण प्रत्येक शुभेच्छांच्या मेसेजला उत्तर देतात. पण रेनीच्या बाबतीत मात्र उलटंच झालं. रेनीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अचानक फोटो डिलीट केल्याने तिच्या वैवाहिक जीवनात एका दिवसात काही घडलं का, असे प्रश्न लोकांना पडू लागले. तिने फोटो हटवल्यानंतर अनेक तर्क-वितर्क सुरू होते त्यानंतर तिनेच स्वतः एक पोस्ट करून फोटो डिलीट करण्यामागचं कारण सांगितलं.
रेनीच्या लग्नाची पोस्ट झाली व्हायरल
खरं तर, ५ जुलै रोजी अभिनेत्री रेनी ध्यानीने इन्स्टाग्रामवर तिच्या फोटो पोस्ट केले होते. तिने अरेंज मॅरेज केल्याची माहिती या पोस्टमधून दिली होती. “जेव्हा एका छोट्याशा स्माईलने आमच्यातील अंतर कमी झालं तेव्हा अरेंज्ड मॅरेजचं रुपांतर प्रेमविवाहात झालं” असं कॅप्शन तिने एका पोस्टला दिलं होतं.
यानंतर रेनीने लग्नातील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “जेव्हा तुम्हाला हे समजतं की काही दिवसांत तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल तुमच्या पतीबरोबर चर्चा करणार आहात.” रेनीने हे फोटो व व्हिडीओ पोस्ट केल्यावर शुभेच्छांचा जणू महापूर आला. इतक्या कमेंट्स व मेसज आणि फोन कॉल्स पाहून गोंधळलेल्या रेनीने लग्नाचे फोटो डिलीट केले. तिच्या जुन्या पोस्ट तशाच आहेत. आता तिने या पोस्ट डिलीट केल्यानंतर चाहते विचारात पडले की नेमकं झालं तरी काय, अचानक रेनीने पोस्ट हटवल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या.
अमिताभ बच्चन, शाहरुख खाननंतर आता क्रिती सेनॉनने अलिबागमध्ये समुद्रकिनारी खरेदी केला भूखंड
रेनीने सांगितले पोस्ट डिलीट करण्याचे खरे कारण
रेनीने इन्स्टाग्राम स्टोरीजवर लग्नाचे फोटो डिलीट करण्याचे खरे कारण सांगितले आहे. “गैरसोयीबद्दल क्षमस्व, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. पण योग्य वेळी योग्य पद्धतीने गुड न्यूज शेअर केली जाईल. मी खूप सारे मेसेज आणि कॉल्स पाहून मी अस्वस्थ झाले होते,” असं रेनीने लिहिलं.