‘बिग बॉस ९’फेम युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स आणि युविका दोघेही बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले दिसत होते. आता त्यांना मुलगी झाली आहे. शनिवारी संध्याकाळी युविकाने मुलीला जन्म दिला. प्रिन्स आणि युविकाच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे आई-वडील झाले आहे.

लग्नाच्या सहा वर्षांनंतर चिमुकल्या सदस्याचं आगमन

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सचे वडील जोगिंदर नरुला यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले, “मुलीचा जन्म झाला आहे, आम्ही खूप आनंदात आहोत.”

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
Premachi Goshta Fame Actress Amruta Bane
सासरे असावेत तर असे! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट; अभिनेता पती कमेंट करत म्हणाला…
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला हे सतत चर्चेत राहणारे लोकप्रिय जोडपे आहे. त्यांची ओळख बिग बॉसच्या ९ व्या पर्वात झाली होती. त्यावेळीच त्यांच्यामध्ये मैत्री झाली. शोनंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले. २०१६ ला त्यांनी साखरपुडा केला आणि २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते, त्याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

याआधी युविकाने बाळाच्या येण्याबाबत आनंद व्यक्त करत म्हटले होते, “आम्ही ही नवीन जबाबदारी घेण्यास तयार आहोत, या सुंदर काळाचा आनंद घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

युविका चौधरी इन्स्टाग्राम

याबरोबरच युविकाने एका मुलाखतीत म्हटले होते, “मला वाटत होते की आधी प्रिन्सचे करिअर चांगल्या पद्धतीने होऊ दे, त्यामुळे आम्ही फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकलले होते. मात्र, नंतर मला लक्षात आले की वाढत्या वयानुसार तुमचे शरीर अनेक गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी प्रिन्सबरोबर आयव्हीएफबद्दल बोलले. मला प्रिन्सच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करायचा नव्हता, त्यामुळे आम्ही आमच्या पालकत्वाचा प्रवास आयव्हीएफद्वारे करण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा: Video : “दाजींना सांग चांगली गाणी…”, अंकिता अन् सूरजचं फोनवर भन्नाट संभाषण; ‘कोकण हार्टेड बॉय’ला दिला खास निरोप

प्रिन्स बिग बॉस ९ आणि रोडीज एक्स ४ चा विजेता आहे. प्रिन्स नेहमीच युविकाबाबत प्रेम व्यक्त करत असतो. सोशल मीडियावर तो युविकाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच युविकाचे डोहाळे जेवण पार पडल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दोघेही आनंदात आणि बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमाला दोघांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.

Story img Loader