बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे नेहमीच चर्चेत असतो. त्यानं इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तो ‘खतरों के खिलाडी १३’ पाहायला मिळतं आहे. अशातचं त्यानं जुहू बीचवर जाऊन साफसफाई केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे शिवच्या कामाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – लावणीविषयी बोलताना लोकप्रिय दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर शिवचा जुहू बीचवरचा साफसफाई करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, शिव बीचवरील कचरा वेचताना दिसत आहे.

शिवाय शिवनं सुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला हा व्हिडीओ शेअर केला आहे. “आपण एकत्र मिळून बदलू शकतो”, असं त्यानं व्हिडीओच्या खाली लिहिलं आहे.

हेही वाचा – “मारझोड करून इस्लाम स्वीकारण्यास…” राखी सावंतचा पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, “दोन वेळा घटस्फोट…”

शिवच्या या व्हायरल व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “शिव खूप चांगलं काम करतोय.” तर दुसऱ्या नेटकरीनं शिव ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं लिहिलं आहे की, “कॅमेरासाठी करत असल्याचं काही लोकं प्रतिक्रियेत म्हणतं आहेत. पण तो तर काम करत आहे. तुम्ही लोकं घरात बसून काय करताय? हा कचरा तुम्हीच केला असेल. या निसर्गाची काय अवस्था केली आहे. आपण सगळ्यांनी यासाठी काम केलं पाहिजे. कुठेही कचरा टाकूच नका. पुढच्या पिढीसाठी निर्सगाला वाचवा.”

हेही वाचा – “…म्हणून आदिल मला टार्गेट करतोय”; राखी सावंतने सांगितली कारणे, म्हणाली…

दरम्यान, शिवनं करिअरची सुरुवात ‘रोडिज’ या रिअ‍ॅलिटी शोपासून केली. त्यानंतर तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकला आणि विजेताही ठरला. मग त्यानं हिंदी ‘बिग बॉस १६’मध्ये प्रवेश केला आणि तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.

Story img Loader