मराठी बिग बॉसमुळे प्रसिद्धी झोतात आलेला शिव ठाकरे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मराठी बिग बॉस नंतर शिव ‘रोडिज’ आणि नंतर हिंदी ‘बिग बॉस १६’मध्येही झळकला. आता शिव ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये पाहायला मिळतं आहे. त्यानं इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे त्याला एका पाठोपाठ एक रिअॅलिटी शो मिळतं आहेत. नुकतच शिव ठाकरेच्या आईने त्याच्या लग्नबाबत वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- पॉर्नस्टार म्हणणाऱ्यांना राखी सावंतने दिलं उत्तर, म्हणाली, “आतापर्यंत मी…”
पापराझिंनी शिवच्या आईला मुलाचं लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला होता. यावर त्या उत्तर देत म्हणाल्या, “करणार करणार लवकरच करणार.” दरम्यान मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात असताना शिव आणि वीणा या जोडीची चांगलीच चर्चा रंगली होती. या शोमध्ये असताना शिवनं एका टास्क दरम्यान वीणा नावाचा हातावर टॅटूही काढून घेतला होता. त्यानंतर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर वीणानेही शिवच्या नावाचा टॅटू हातावर काढला होता. काही काळासाठी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण कालांतराने शिव आणि वीणाचा ब्रेकअप झाल्याचे समोर आलं होतं.
त्यानंतर आता शिवचं नाव पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेत्री डेजी शाहबरोबर जोडलं जात आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु, आता डेजीनं शिवला डेट करत नसल्याचं स्पष्टच सांगितलं होत. काही दिवसांपूर्वी शिवने स्वत: आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. शिव म्हणालेला “खरंतर आता माझं करिअर सुरू झालंय. चेहऱ्यावरचं जे आता हसू आहे, उगाच नको ना जायला. चेहऱ्यावर नॅचरल हसू राहिलं पाहिजे”