Bigg Boss Eliminated Aarya for slapping Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात भांडण झालं. ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीदरम्यान वाद झाला आणि नंतर आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. या घटनेचा निर्णय आज भाऊच्या धक्क्यावर झाला. रितेशने आधी घटनाक्रम सांगितला आणि त्यानंतर बिग बॉसने आर्याला घरातून बाहेर काढलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश म्हणाला, “आर्या, तुमचं वारंवार एक स्टेटमेंट आहे की निक्की असं वागतेय तर मीही असंच वागणार. निक्की धक्काबुक्की करते, मीही करणार, ती खेचाखेची करते मीही करणार. आर्या मी निक्कीच्या वागण्यावरून त्यांना ओरडलोय आणि या सीझनभर त्यांची इम्युनिटी काढून घेतलीय, त्या सीझनभर कॅप्टन होऊ शकणार नाहीत. त्यामुळे निक्की वागते तसं मी वागणार हा अॅटिट्यूड मी मान्य करणार नाही. मग तो निक्कीचा असो वा तुमचा असो. याच अॅटिट्यूडनी तुम्ही कॅप्टन्सी टास्क खेळलात. तुम्ही स्ट्रॅटर्जी केली की निक्की आत येऊ नये म्हणून दरवाजा अडवायचा. ज्यावर वर्षाजींनी तुम्हाला सांगितलं की ही स्ट्रॅटर्जी चुकीची आहे, असं आपण करू नये. बरोबर ना वर्षाजी.. वर्षा हो म्हणाल्या.”

“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

पुढे रितेश म्हणाला, “ठीक आहे आर्याला वाटलं ही स्ट्रॅटर्जी आहे यामुळे त्या निक्कीला थांबवतील. निक्की आल्या, दरवाजाला धक्का मारायला लागल्या, त्यांनी अरबाजची मदत घेतली. आम्हाला प्रेक्षक म्हणून वाटलं की समजा अरबाजनी जोरात धक्का मारला आणि तो आर्याला लागला तर काय होईल. आम्हाला प्रेक्षक म्हणून तुमची चिंता असते. अरबाजने काळजी घेतली. धक्का मारताना त्याने जोर लावला नाही. नंतर निक्की आत आल्या, मग सुरू झाली तुमची धक्काबुक्की. याची सुरुवात इथे झाली नव्हती, दुसऱ्या रुममध्ये झाली होती. तिथे सर्वजण हिरा प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होते, तिथे निक्की तो घेण्यासाठी आल्या आणि तुम्ही निक्कीचे हात पकडले. आर्या तुम्हाला माहितीये का, निक्की तिथे जे बोलत होत्या, इन्स्टिगेट करत होत्या ते त्या पॅडी आणि अंकितालाही करत होत्या. त्यावर या दोघांनी तिला म्हटलं की निक्की आम्हाला फुटेज देऊ नकोस, आम्हाला फुटेज नको. त्या परिस्थितीत कसं डील करायला पाहिजे होतं ते अंकिता व पॅडी यांनी करून दाखवलं. त्यावेळेच निक्कीला वाटलं की आपण इथे काहीच करू शकत नाही, त्या तिथून निघून गेल्या. त्या तुमच्याकडे आल्यावर तुम्ही फिजीकल झालात.”

“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…

पुढे रितेश म्हणाला, “ती गोष्ट झाली तिकडे. पण आता जेव्हा बाथरुममध्ये निक्की आल्या, तुम्हाला त्यांना आत येऊ द्यायचं नव्हतं, या धक्काबुक्कीत तुम्हाला निक्कीचा हात लागला. त्यानंतर तुमचा संयम सुटला आणि तुम्ही काय म्हणालात, “निक्की मी तुला मारेन” आणि त्यानंतर तुम्ही निक्कीवर हात उचलला. आर्या तुम्ही स्वतःला काय समजता? म्हणजे तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार? स्वतःवर नियंत्रण नाही? हे बिग बॉसचं घर आहे. या घरात खेचाखेची, धक्काबुक्की सगळ्या सिच्युएशन आल्यात, पण कोणीही स्वतःवरचा ताबा सोडला नाही. कोणीही कोणावर हात उचलला नाही. तुम्ही जे केलं ते जाणीवपूर्वक केलंत, मी बिग बॉसना सांगतो की त्यांनी आपला निर्णय सांगावा.”

Video: “माझी मुलगी मार खायला गेली आहे का?” आर्याने कानशिलात मारल्यावर निक्की तांबोळीच्या आईचा सवाल; म्हणाल्या, “वर्षाताई…”

बिग बॉस काय म्हणाले?

यानंतर बिग बॉसने निर्णय सुनावताना म्हटलं, “कॅप्टन्सी टास्कमधील आर्या आणि निक्की यांच्यातील वादाचे फुटेज वारंवार पडताळून पाहिल्यावर असं आढळलं की बाथरूम एरियात निक्की आणि आर्या यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यात निक्कीचा धक्का आर्याला लागला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने केलेले कृत्य घरातील सर्वात महत्त्वाच्या आणि मुलभूत नियमाचे उल्लंघन आहे जे कठोर शिक्षेस पात्र आहे. बिग बॉसच्या घरात अशा निंदनीय कृत्यांना जागा नव्हती, आताही नाही आणि नसेल. त्यामुळे बिग बॉस आर्याला आता या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहेत. आर्या मुख्य प्रवेशद्वारामार्गे बाहेर या.” बिग बॉसच्या या निर्णयानंतर आर्या रडत घराबाहेर पडली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss eliminated aarya for slapping nikki tamboli bigg boss marathi 5 riteish deshmukh hrc