सध्या सोशल मीडियावर संजू राठोड व प्राजक्ता घाग यांचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं ट्रेंड होतं आहे. या गाण्याने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अक्षरशः वेडं लावलं आहे. माधुरी दीक्षित, रेमो डिसुजा असे प्रत्येक कलाकार या गाण्यावर व्हिडीओ करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात झळकलेली आयशा खानने नुकताच या गाण्यावर व्हिडीओ केला आहे; जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
“गुलाबी साडी”, असं कॅप्शन लिहित आयशा खानने तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, आयशा गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तसंच ‘गुलाबी साडी’ या गाण्यावरील तिची अदा व नृत्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिने कमेंट्समध्ये लिहिलं आहे, “मी भारी दिसतेय? मग काय म्हणता?” यावर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा – अमेरिकेहून भारतात परतणारी मृणाल दुसानिस पुन्हा मनोरंजनसृष्टीत करणार कमबॅक? म्हणाली, “मला आता…”
आयशा खानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एवढंच नाहीतर संजू राठोड व प्राजक्ता घागने देखील आयशाचं कौतुक केलं आहे. “तू भारी नाही तर खूप म्हणजे खूप सुंदर दिसतेय”, “गुलाबी साडीमध्ये तू छान दिसतेय”, “भारी दिसतेय”, “नजर नको लागायला”, “तू माझा जीव घेतलास”, अशा अनेक कमेंट्स आयशाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, आयशा खानने ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात वाइल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला होता. पण ती जास्त काळ ‘बिग बॉस’ घरात टिकली नाही. काही दिवसांपूर्वी तिने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं की, ती लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे आता आयशा कोणत्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय? हे पाहणं महत्त्वाच आहे.