‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिक सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अब्दुने काही दिवसांपूर्वी १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा करत त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. आता लवकरच ताजिकिस्तानचा लोकप्रिय गायक लग्नबंधनात अडकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अब्दुने त्याच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. अनेकांनी अब्दुने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत या कपलला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर काहीजणांनी त्यांच्या लग्नावरवरच प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याच्या उंचीवरून खिल्लीदेखील उडवली आहे. याबाबत निराशा व्यक्त करत अब्दुने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अब्दुने शेअर केलेल्या व्हिडीओत तो म्हणाला, “नमस्कार, मी सर्वात आधी ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो. या चांगल्या बातमीसह काही वाईट गोष्टीदेखील घडत आहेत आणि त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. कारण खूप जणांनी वाईट कमेंट्स केल्या आहेत.”

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो

अब्दु पुढे म्हणाला, “माझ्या आणि अमीराच्या साखरपुड्यामुळे काहीजण माझ्यावर हसत आहेत. वाईट कमेंट्स करत आहेत. तुम्हाला या गोष्टीची बिल्कूल जाणीव नसेल की अमीरा आणि तिचं कुटुंब त्या सगळ्या कमेंट वाचते.”

“अमीराच्या कुटुंबाने आणि मी खूप विचारविनिमय करून आमच्या नात्याबद्दल जाहीर घोषणा केली. तिचा आणि माझा फोटो सोशल मीडियावर ठेवण्याबाबतही मी तिच्या पालकांकडून त्यांची परवानगी घेतली आणि तुम्ही सगळे त्याच फोटोखाली खूप वाईट वाईट कमेंट्स करत आहात.”

“माझ्या लग्नाची बातमी ऐकताच, हे खरं लग्न खरं आहे की खोटंआहे असंदेखील लोक विचारत आहेत. तुम्हाला असं वाटतंय की माझी उंची लहान आहे, मी लहान दिसतो म्हणून माझ लग्न होऊ शकत नाही. मी लग्न करू शकत नाही, खूश राहू शकत नाही. या जगात अनेक लोक अंध आहेत, काही जणांना हात नाहीत, पाय नाहीत पण देवाच्या कृपेने त्यांचीदेखील लग्न होतात. माझी तब्येत तर अगदी उत्तम आहे. फक्त मी लहान आहे किंवा माझी उंची कमी आहे म्हणून माझं लग्न होऊ शकत नाही, असं नाहीय ना.”

हेही वाचा.. “नेटफ्लिक्स अडल्ट आणि गलिच्छ…”, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’बद्दल कॉमेडीयन सुनील पालची टीका, म्हणाला…

“कृपया करून सोशल मीडियावर लोकांबद्दल अशा वाईट कमेंट्स करू नका. कारण तुमच्या अशा कमेंट्समुळे लोकांना मानसिक त्रास होऊ शकतो. पुढे तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या मुलांच्या आयुष्यात काय घडणार असेल हे आपल्यालाही ठाऊक नसतं.”

“मला आधी माझ्या उंचीमुळे लाज वाटायची. ज्या कुटुंबात माझ्यासारखी मुलं आहेत त्यांना त्यांचे पालक लपवून ठेवत असत. पण आता मी आणि माझ्यासारखे अनेक जण त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.”

हेही वाचा… “माझं तुझ्यावर खूप प्रेम…”, अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, अब्दु रोजिकने ५ दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची बातमी देत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. त्यानंतर लगेचच त्याने साखरपुडा उरकला. ‘खलीज टाइम्स’च्या वृत्तानुसार, अब्दु आणि अमीराचं लग्न ७ जुलै रोजी यूएईमध्ये पार पडणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame abdu rozik got trolled on engagement photos due to his height dvr