‘बिग बॉस १६’फेम अब्दु रोजिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. २० वर्षीय अब्दुने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. लगेच दुसऱ्या दिवशी अब्दुने १९ वर्षीय अमीराशी यूएईमध्ये साखरपुडादेखील उरकला. अमीरा आणि त्याचे फोटो अब्दुने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अब्दु-अमीराच्या साखरपुड्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि अनेकांनी अब्दुला ट्रोलदेखील केलं. अब्दुच्या या आनंदावर विरझण घतल्यासारखं झाल्यामुळे त्याने सगळ्या ट्रोलर्सला विनंती करत एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो म्हणाला की, माझं लग्न अनेकांना खोटं वाटतंय पण ते खरं आहे. माझी उंची लहान आहे म्हणून माझं लग्न होऊ शकत नाही असं लोकांना वाटतंय. अशाप्रकारचा एक व्हिडीओ अब्दुने सोशल मीडियावर शेअर करून ट्रोलर्सची बोलती बंद केलीय.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा… राखी सावंत रुग्णालयात दाखल; ह्रदयाशी संबंधित आजारामुळे बिघडली प्रकृती; फोटो व्हायरल

अब्दु लवकरच सुरू होणाऱ्या त्याच्या नवीन आयुष्यासाठी खूपच उत्साही दिसत आहे. लवकरच अब्दुचं लग्न पार पडणार असून तो लग्नाच्या तयारीलादेखील लागला आहे. अब्दु रोजिकने त्याच्या सोशल मीडियावर मंगळवारी एक फोटो शेअर केला. यामध्ये अब्दुने त्याच्या हाताला आणि चेहेऱ्याला फेस पॅक लावल्याचं दिसून येतंय. या फोटोला कॅप्शन देत “शादी रेडी” असं अब्दुने लिहिलं. अब्दुचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अब्दुनं याआधी ’ई टाइम्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल भाष्य केलं होतं. अब्दु म्हणाला होता, “जीवनाच्या अनिश्चिततेदरम्यान अमीरा माझ्या आयुष्यात येणं हा एक विलक्षण आशीर्वाद आहे. आता माझं हृदय कृतज्ञतेनं ओसंडून वाहतं आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण आता मला उत्साहपूर्ण वाटत आहे. अमीरामुळे जणू मला जगण्याचा अर्थच कळला आहे.”

हेही वाचा… VIDEO: “माझी उंची लहान…”, १९ वर्षीय अमीराशी लग्नाचा घाट घातलेल्या अब्दू रोजिकला केलं जातंय ट्रोल, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, अब्दु रोजिकने काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची बातमी दिली आणि त्यानंतर लगेचच साखरपुडा उरकला. ‘खलीज टाइम्स’च्या वृत्तानुसार, अब्दु शारजाहमधील एक अमिराती मुलगी १९ वर्षीय अमीराबरोबर लग्न करणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अब्दु तिला दुबईच्या एका मॉलमध्ये भेटला होता. हे लग्न ७ जुलै रोजी यूएईमध्ये पार पडणार आहे.

Story img Loader