तब्बल तीन दशक एक हाती संगीत क्षेत्रावर राज्य करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती. २८ सप्टेंबर १९२९ साली लतादीदींचा इंदूर येथे जन्म झाला. वयाच्या ११व्या वर्षांपासून त्यांनी गायनास सुरुवात केली होती. संगीत क्षेत्रात लतादीदींचं अभूतपूर्व योगदान आहे. त्यामुळे त्यांना ‘डॉटर ऑफ द नेशन’ ही पदवी देण्यात आली आहे. आज लतादीदी नसल्या तरी त्यांचा आवाजाची जादू कायम असणार आहे.

हेही वाचा –“तुम्ही आहातच इथे…” लतादीदींसाठी सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाले…

लतादीदींच्या आज जयंतीनिमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. तसेच लतादीदींबरोबरचे अनुभव शेअर करत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अभिजीत केळकरनं लता मंगेशकर यांच्याविषयी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिजीतनं लतादीदींचा फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “…मला शक्य असतं, देवाने तशी सोय ठेवली असती तर माझ्या आयुष्याची काही वर्ष मी अगदी सहज तुमच्या चरणी वाहिली असती…माझ्या आई-वडिलांनी, बायकोने, मुलांनी… माझ्या भावना समजून घेऊन मला तशी परवानगीही दिली असती…आजही तुमचं अस्तित्व ठाई ठाई जाणवतं, मन-आत्मा तृप्त करतं आणि करत राहील… वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा दीदी…”

हेही वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद?; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

हेही वाचा – Video: राखी सावंत इस्लामची खिल्ली उडवतेय? धर्मासाठी इंडस्ट्री सोडणारी सना खान म्हणाली, “मी खरंच…”

दरम्यान, अभिजीत केळकर व्यतिरिक्त अनेक कलाकार मंडळींनी लतादीदींना शुभेच्छा दिल्या आहे. सलील कुलकर्णी, सावनी रविंद्र, हेमांगी कवी अशा बऱ्याच कलाकार मंडळींनी लतादीदींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader