‘उतरन’ व ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री टीना दत्ता ही तिच्या कामामुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ३३ वर्षीय टीना अद्याप अविवाहित आहे, पण तिने मातृत्वाबद्दल भाष्य केलं आहे. टीनाने भविष्यात ती ‘सिंगल मदर’ व्हायचे निर्णय घेऊ शकते, असं म्हटलं आहे.

टीनाच्या मते, तिने सिंगल मदर व्हायचं ठरवलं नसलं तरी ती सरोगसी किंवा दत्तक घेणे या पर्यायांचा विचार करू शकते. “मला वाटतं की मी एक चांगली आई होईल. मी सिंगल मदर व्हायचा प्लॅन केला नसला तरी मी दत्तक घेऊन किंवा सरोगसीच्या माध्यमातून आई होणं, या पर्यायांचा मी विचार करू शकते,” असं टीना म्हणाली.

टीनाने एकल माता (सिंगल मदर) झालेल्या महिलांचेही कौतुक केले. ती म्हणाली, “मला सुश्मिता सेनसारख्या महिलांचं खूप कौतुक वाटतं, तिने दोन सुंदर मुलींना दत्तक घेतलं आहे. माझे आई-वडील एका छोट्या शहरातील आहेत आणि मी बंगाली आहे. असे असूनही, ते खूप प्रगत विचारांचे आहेत. मी मूल दत्तक घ्यायचे ठरवले किंवा सरोगसीद्वारे मूल हवं असं ठरवल्यास ते मला पाठिंबा देतील. जर मी माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते, तर मी मुलाचीही काळजी घेऊ शकते. यासाठी पतीवर अवलंबून राहणं गरजेचं नाही.”

इंडस्ट्रीमध्ये नसलेल्या अनेक मित्रांनी दत्तक घेतली मुलं

टीना म्हणाली, “समाजात बदल होत आहे आणि या गोष्टी स्वीकारल्या जात आहे. आम्ही शो बिझनेसमध्ये असल्यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष ठेवलं जातं. लोकांना वाटतं की मनोरंजनविश्व बदल घडवून आणत आहे, पण त्याच्या बाहेरही या गोष्टी स्वीकारल्या जात आहेत. माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी मुलं दत्तक घेतली आहेत, पण ते इंडस्ट्रीमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांच्या बातम्या होत नाहीत मथळे करत नाहीत. इंडस्ट्रीतील गोष्टी काही प्रमाणात अतिशयोक्ती केलेल्या असतात, कारण आम्ही जे काही करतो ते सार्वजनिक होतं.”

टीना दत्ता नुकतीच मुंबईतील जिम कल्चरवर आधारित क्राइम-थ्रिलर सीरीज ‘पर्सनल ट्रेनर’ मध्ये झळकली होती. ही सीरिज का केली, असं विचारल्यावर टीना म्हणाली, “कथा खूपच आकर्षक होती. ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे आणि इसं काही मी आधी केलं नव्हतं. या सीरिजचे लेखन व दिग्दर्शन माझा मित्र अमित खन्नाने केलं आहे. त्याने ‘सेक्शन 365’ व ‘366’ सारख्या शोसाठी काम केलं आहे. हा प्रोजेक्ट दमदार आहे, याची जाणीव असल्याने काम करायला होकार दिला.” ‘पर्सनल ट्रेनर’ ही सीरिज २३ जानेवारीला हंगामावर रिलीज झाली आहे.

Story img Loader