दोन वर्षांचा तुरुंगवास भोगून काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाज खानची सुटका झाली. ड्रग्ज प्रकरणात एजाजला २०२१ साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर १९ जून २०२३ रोजी त्याला जामीन मिळाला. २६ महिने तुरुंगात असल्यामुळे एजाज नैराश्यात गेला होता. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यानं तुरुंगात उंदीर, किडे असलेली डाळ खाल्ल्याचा भयाण अनुभव सांगितला.
आर्थर रोड कारागृहातील अनुभव सांगताना एजाज म्हणाला की, “मी तुरुंगात खूप पुस्तकं वाचली आणि खूप काही शिकलो. मला जास्त करून अन्नाची किंमत कळाली. मी तिथे इतर कैदी व गँगस्टरांबरोबर रहात होतो. त्यामुळे मला माझ्या आयुष्याचं महत्त्व अधिक कळालं. मी तुरुंगात कोरड्या पोळ्या आणि दगडासारखा भात खायचो. शिवाय उंदीर आणि किड्यांनी भरलेली डाळही खायचो. जर आज मला अशाप्रकारचं थोडसं जरी जेवण दिलं तरी मी ते आनंदानं खाईन.”
हेही वाचा – “तुमच्याबरोबर काम करणं अभिमानास्पद”, शाहरुख खान दाक्षिणात्य सुपरस्टारच्या प्रेमात
“तुरुंगातील दोन वर्ष खूप कठीण होते. मी सत्य बोललो आणि यामुळे माझेच लोक दूर गेले. २६ महिने मी माझ्या कुटुंबाशिवाय काढले. वडिलांची तब्येत खूप बिघडली होती. मी ईश्वराचा खूप ऋणी आहे, त्याने माझ्या कुटुंबासाठी मला जिवंत ठेवलं आणि त्या कठीण परिस्थितीत मला लढण्याचे बळ दिलं.”
हेही वाचा – टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम सुपरस्टारवरही; अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला, “आता खाण्याबाबत….”
पुढे एजाज म्हणाला की, “या काळात मला खरी माणुसकी दिसली; ज्यांनी मला कठीण काळात साथ दिली. याही परिस्थितीत मी मित्र बनवले. ज्या लोकांवर मी विश्वास ठेवला, त्यापैकी बरेचजण मला सोडून गेले; तर काहींनी मला आणि माझ्या कुटुंबीयांना पाठिंबा दिला. मी जेलमध्ये का गेलो हे मला कळलं नाही. मी विमानतळावरून परतत होतो, त्यावेळेस काही अधिकारी आले. त्यांनी मला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आणि काही क्षणात त्यांनी मला तुरुंगात टाकलं. आता मी या सिस्टमबरोबर लढू इच्छित नाही. मला माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे.”