एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. नवनवीन ट्वीस्ट आणि नवीन पात्रांची एन्ट्री यामुळे या मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता अशातच नव्या पात्राची जबरदस्त एन्ट्री झाली आहे.
हेही वाचा – Video: “देशात दोन गोष्टी विकल्या जातात सेक्स आणि…”, राज कुंद्राचं वक्तव्य चर्चेत
सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत नेत्रा परतली आहे. तिचं लग्न झालेलं असून तिचा नवरा अत्याचार आणि मारहाण करणारा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खूणा दिसत आहे. पण नेत्राच्या परत येण्याने अप्पू आणि शशांकमध्ये दूरावा निर्माण झाला आहे. नेत्राला शशांकच्या मिठीत पाहिल्यामुळे अप्पूने थेट माहेर गाठलं आहे. अशातच अप्पू नेत्राच्या घरी जाते. तेव्हा नेत्राचा नवरा तिच्यावर अत्याचार करत असतो. तिचा लॅपटॉप फेकून देतो, हे सर्व पाहून अप्पूला धक्काच बसतो.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, “माणुसकी शिल्लक आहे”
नेत्राचा नवरा निनाद हेच नवं पात्र बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारेने साकारलं आहे. क्रूर नवऱ्याच्या भूमिकेत तो झळकला आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाचं चर्चेत आला आहे.
हेही वाचा – Video: अखेर सईला मिळणार आईची माया? असा रंगणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड…
हेही वाचा – Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ
दरम्यान, अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, त्याने बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘ती फुलराणी’, ‘प्रतिशोध’ यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. तसेच त्याने ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंडे’, ‘शेर शिवराज’, ‘बेधडक’, ‘बस स्टॉप’, ‘दोस्तीगिरी ‘अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. आता अक्षय ‘खुर्ची’ या नवीन चित्रपटात झळकणार आहे. १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.